चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान चोरीची एक मोटरसायकल जप्त व
101 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई कारवाई
101 गड्यांपैकी 20 गाड्यांची कागदपत्र पडताळणी बाकी
मोहिमेदरम्यान एक चोरीची गाडी जप्त आरोपीस अटक करून घेतली पोलीस कस्टडी रिमांड
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज दिनांक 4 10 2024 रोजी सकाळी सहा ते दहा तीस वाजे दरम्यान विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती.
( वाणिज्य प्रतिनिधी साभार)
सदर मोहिमेदरम्यान एकूण 101 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली.
101 वाहना पैकी 60 वाहनांकडून 30000 रुपये दंड ऑनलाईन पदधतीने पेड करून घेतला आहे.
21 वाहनांवर 17500/- अनपेड दंड टाकण्यात आलेला आहे.
अशाप्रकारे 81 वाहनांवर
एकूण दंड-47500/- दंड आकारण्यात आलेला असून
( Advt )
101 दुचाकी वाहनांपैकी 81 वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे .
उर्वरित 20 वाहनां ची कागदपत्रे अद्याप पर्यंत नागरिकांनी हजर न केल्याने ती वाहने पोलीस स्टेशन येथे जमा आहेत.
*सदर मोहिमेदरम्यान चोरीची मोटरसायकल बजाज डिस्कवर गाडी क्रमांक MH15BQ 8486 ही आरोपी नामे राज अनिल लोंढे रा. भेर्डापूर ता. श्रीरामपूर अहमदनगर याने चोरली असल्याचे खात्री झाल्याने त्यास अटक करून मा.न्यायालयापुढे हजर करून त्याची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. सदर चोरीच्या गाडीबाबत पोलिस हवालदार अशोक शिंदे तपास करत आहेत.*
राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोध ही सोपा होईल.
सदर चोरीचे वाहन शोध मोहीम ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र पिंगळे, अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील समाधान फडोळ ,सुदर्शन बोडखे, विष्णू आहेर साहेब , सहाय्यक फौजदार फुलारी, पो.हेड कॉन्स्टेबल बाबा शेळके, हनुमंत आव्हाड, संदीप ठाणगे, संजय राठोड, सुरज गायकवाड, राहुल यादव, बापू फुलमाळी, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने, सतीश कुराडे, अंकुश भोसले, जालिंदर धायगुडे, भाऊसाहेब शिरसाट, गणेश लीपणे, समादेशक आरिफ इनामदार तसेच होमगार्ड भागवत तनपुरे, भाऊसाहेब जाधव, यशवंत बाचकर, दीपक जाधव, महेश मस्के, काशिनाथ चव्हाण, संजय ढसाळ, रमेश आघाव, भाऊसाहेब धनेधर, प्रमोद जाधव , संजय इंगळे, ओंकार उंडे, चांगदेव कोबरने, बाळासाहेब वराळे, ऋषिकेश ढगे, गणेश नवले, अशोक मोहिते, काशिनाथ उमाप, विनोद ससाने, शामवेल ससाने, सुफियान पठाण, सिद्धार्थ घोडके, गोरख राऊत, गणेश खरमाळे, आदिनाथ ढोकणे यांच्या पथकाने केलेली आहे.
Post a Comment
0 Comments