राहुरीत येताय.... सावधान !!
वर्दळीच्या ठिकाणी लावले आहेत बॅरिगेट्स
सतर्क खबरबात जिल्ह्याची - टीम कडून
हा काही सावधानतेचा इशारा नव्हे .सध्या दिवाळी सण असल्यामुळे राहुरी शहरात दिवाळी सणाच्या खरेदीसाठी वर्दळ वाढली असून राहुरी शहरात दिवाळी सणांच्या वस्तूंची दुकाने थाटलेली असल्याने त्यातच मोठ्या प्रमाणात दुचाकी व चार चाकी वाहन येत असल्याने ठिकठिकाणी रात्रीतून बॅरिगेट्स लावण्यात आलेली आहेत .
केवळ दुचाकी व पादचाऱ्यांना जाता येईल इतकीच जागा सोडून ही बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत .
त्यामुळे बाहेरून आपली कार जीप पिकप घेऊन येत असाल तर आपल्याला आपली वाहने शहरातील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बाहेरच लावावी लागणार आहेत.
राहुरी शहरात बस स्थानक चौक , नवी पेठ , नगरपालिका परिसर आदी ठिकाणी लाकडी अर्थात बॅरिगेट्स लावण्यात आलेली आहे . यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असली तरी चार चाकी वाहन लावण्यासाठी वाहन चालकांना पार्किंगची जागा मात्र शोधावी लागणार आहे . आपण दिवाळी सण उत्साह साजरा करताना प्रशासनाच्या सूचना व सावधानता बाळगावी , असे आवाहन सतर्क खबरबात जिल्ह्याची करत आहे .
Post a Comment
0 Comments