राहाता शहराच्या इतिहासात प्रथमच इतक्या महिला....
राष्ट्र सेविका समिति अहिल्यानगर विजयादशमी उत्सव २०२४
राहता ( प्रतिनिधी )
राहाता शहराच्या इतिहासात प्रथमच शनिवार दिनांक १९/१०/२०२४ रोजी राष्ट्र सेविका समिती च्या वतीने विजयादशमी उत्सवानिमित्त महिलांचे सघोष पथसंचलन चे आयोजन करण्यात आले होते .
विजयादशमी हा समितिचा स्थापना दिवस आहे. यानिमित्त शनिवार दिनांक १९/१०/२०२४ रोजी, दुपारी ४.०० वाजता, श्री साईनाथ मंदिरापासून संचलनास सुरुवात झाली, प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले .
( जनहितार्थ )
समितीच्या युवती माता भगिनी यांनी विशेष गणवेशात संपुर्ण राहाता शहरातून सघोष पथसंचलन करुन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले ,
राहाता येथील श्री साईनाथ मंदिरात
राष्ट्र सेविका समिती नाशिक विभाग कार्य वाहिका श्रीमती शुभांगीताई कुलकर्णी व प्रमुख वक्त्या सौ मनीषा बारबींद, कोपरगाव यांच्या सह उपस्थित मातृ शक्तींनी शस्त्रपुजन केले, उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्र सेविका समिती नाशिक विभाग कार्यवाहिका श्रीमती शुभांगीताई कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्र सेविका समिती महीला सक्षमीकरन करणारी एक अप्रतिम संघटना आहे तसेच आपल्या सह इतरही माता भगिनींनी यात मनापासून सहभाग घेतला पाहिजे.
विजयादशमी हा समितीचा स्थापना दिवस आहे. यानिमित्त शनिवार दिनांक १९/१०/२०२४ रोजी, दुपारी ४.०० वाजता, श्री साईनाथ मंदिरापासून संचलनास सुरुवात झाली, प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले,
समितीच्या युवती माता भगिनी यांनी विशेष गणवेशात संपुर्ण राहाता शहरातून सघोष पथसंचलन करुन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले ,
प्रमूख वक्त्या सौ मनीषा ताई बारबींद यांनी रा.से.समिती स्थापनेच्या इतिहास आणि संस्कृती ची आठवण करून दिली, वंदेमातरम गिताचे महत्त्व समजावून सांगितलें,विजयादशमी आणि मातृशक्ती बद्दल माहिती दिली.
सौ निताताई राशीनकर राष्ट्र सेविका समिती उत्तर नगर जिल्हा कार्यवाहिका यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राहाता तालुक्यासह राहुरी कोपरगाव तालुक्यातील सेविकांसह शहरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राहाता पोलीस अधिकारी व प्रशासनाचे संचलनात विशेष सहकार्य लाभले
अत्यंत आनंदी वातावरणात विजयदशमी उत्सव पार पडला.
राष्ट्र सेविका समिति ही एक अखिल भारतीय स्त्री संघटना आहे. १९३६ साली वं. लक्ष्मीबाई केळकर यांनी स्थापन केलेली ही संघटना महिला व मुलींसाठी राष्ट्रीय स्तरावर अनेक आयामांच्या माध्यमातून ८८ वर्षे कार्यरत आहे.
Post a Comment
0 Comments