Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची राहुरी येथे भेट ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहणी करून दिल्या सूचना

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची राहुरी येथे भेट





विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहणी करून दिल्या सूचना


राहुरी ( प्रतिनिधी )


आज दि. २५ ऑक्टोबर रोजी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी राहुरीला भेट दिली .




सदर भेटीमध्ये त्यांनी मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तयार केलेल्या सुरक्षा कक्षाचा व मतमोजणी हॉलच्या नियोजनाचा आढावा घेतला. राहुरी विधानसभा मतदारसंघाकरिता रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयामध्ये सुरक्षा कक्ष तयार करण्यात आला असून मतमोजणी देखील तेथेच पार पडणार आहे.



मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, टपाली मतदानाची तयारी, मतदार नोंदणी, मतदान जनजागृती आदी विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी सालीमठ यांनी समाधान व्यक्त केले.



यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे, तहसीलदार नामदेव पाटील, अपर पोलीस अधीक्षक कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, नायब तहसीलदार विशाल सदनापूर, सचिन औटी आदी उपस्थित होते.


विधानसभा निवडणुकीकरिता राज्यात एकाच टप्प्यात दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.


000

Post a Comment

0 Comments