राहुरीत भल्या सकाळी बसस्थानक चौकात दुचाकी वाहनांची पोलिसांकडून तपासणी ; अनेक दुचाकी स्वारांची उडाली भंबेरी
राहुरी ( प्रतिनिधी )
वाढत्या दुचाकी चोऱ्या व वाहतूक जागृत जागरूकता व्हावी, यासाठी आज राहुरीतील नगर मनमाड रस्त्यावरील व बसस्थानक चौकात
दुचाकी वाहन तपासणी मोहीम राहुरी पोलिसांकडून राबविण्यात आली . ( Advt )
यावेळी दुचाकीची पुढील नंबरप्लेट नसणे , नंबर प्लेटवर चिन्ह व अन्य नाव लिहिलेल्या लायसन्स आदी कागदपत्रे नसणाऱ्या दुचाकीवर कारवाई करण्यात आली .
यावेळी मल्हारवाडी कडून राहुरी कडे , नगर हून राहुरी कडे तसेच राहुरी फॅक्टरी होऊन राहुरी कडे येणाऱ्या दुचाकी तपासणी करून नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्यावर राहुरी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली .
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस , गृह रक्षक दलाचे जवान यांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला . या कारवाईचे स्वागत होत असले तरी कॉलेज रस्त्यावरील व राहुरी शहरातील शाळा यांच्या परिसरात रस्त्याने वेडे वाकडे वाहन चालवणारे , टारगट वाहन चालकांवर देखील कार्यवाही राहुरी पोलीस यांनी करावी , अशी मागणी शहर वासियांकडून केली जात आहे .
आज झालेल्या कारवाई रोजच्या कामाला जाणारे , ग्रामीण भागातील , बाहेरील वाहनचालक मात्र या कारवाईत अडकले . अशा कारवाई करताना बस स्थानक चौकात वाहतूक नियमनासाठी पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे .
Post a Comment
0 Comments