📌 तो अनधिकृत चिलिंग प्लांट लवकरच होणार जमीनदोस्त..!
📌जागा मालकाला नगरपालिकेने बजावली नोटीस..!
📌अपूर्ण भूमिगत गटारीत सांडपाणी सोडून नागरीकांच्या आरोग्याशी सुरु होता खेळ..!
📌आप्पासाहेब ढूस यांच्या तक्रारीची नगर परिषदेने घेतली दखल..!
देवळाली प्रवरा - दि.०१/११/२४
देवळाली प्रवरा येथील अनधिकृत चिलिंग प्लांट चे सांडपाणी अवैधरित्या अपूर्ण असलेल्या नगरपालिकेच्या भूमिगत गटारीत सोडल्याने व ते पाणी चेंबर मधुन नागरी वस्तीत वर आल्याने दुर्गंधी पसरली व नागरीकांना प्रदूषणाचा त्रास जाणवू लागल्याने नगरपरिषदेकडे प्रहार चे आप्पासाहेब ढूस यांनी दिलेल्या तक्रारी वरून नगरपरिषदेने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53, 54 नुसार व महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 189 (8) नुसार देवळाली प्रवरा नगरपरिषदेची पूर्व परवानगी शिवाय देवळाली प्रवरा येथील गट नंबर 1613/1/अ मध्ये अनधिकृत चिलिंग प्लांट चे बांधकाम केल्याबद्दल जागा मालक दादासाहेब शिवाजी शिंदे व इतर यांना देवळाली प्रवरा नगरपरिषदेने नुकतीच नोटीस बजावली आहे. व नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत झालेले अनधिकृत बांधकाम काढून घेण्याचे नोटीस मध्ये नमूद केले आहे.
( Advt )
चिलिंग प्लांट चे केलेले अनधिकृत बांधकाम नोटिस मध्ये दिलेल्या मुदतीत काढून न घेतल्यास झालेले विना परवाना बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व झालेले विनापरवाना बांधकाम नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत काढून टाकण्यात येईल व त्याचा काढण्याचा संपूर्ण खर्च आपणाकडून सक्तीने वसूल केला जाईल.
( जन हितार्थ )
( जन हितार्थ )
व आपल्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच.. सदरची नोटीस बाबत आपले काही म्हणणे असल्यास सात दिवसात लेखी खुलासा नगर परिषदेत करावा अशा पद्धतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
( Advt )
( Advt )
( Advt )
तसेच या गट नंबर मध्ये सुरु असलेल्या डीएमसी चिलिंग प्लांट दूध प्रोसेसिंग प्लांट यांना बजावलेल्या दुसऱ्या नोटीस मध्ये
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी म्हटले आहे की,
देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडून शहरात विविध ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे काम प्रगतीपथावर असून शहरातील गट क्रमांक 1613/1अ मध्ये असलेल्या आपल्या मालकीच्या दूध चीलिंग प्लांट मधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी सदर भूमिगत गटार योजनेच्या म्यान होलमध्ये अवैधरित्या सोडण्यात येत असून असे केल्यामुळे सदर भूमिगत गटार योजनेचे पाईपलाईन वारंवार ब्लॉक होत असून सांडपाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत आहे. तरी, या नोटीसद्वारे आपणास कळविण्यात येते की आपण आपल्या दूध चिलिंग प्लांट मधून निघणाऱ्या सांडपाण्यावर योग्य प्रकारे शुद्धीकरण प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट आपल्या स्तरावर आपण करावी.. तसेच भूमिगत गटार योजना अजून कार्यान्वित झाली नसल्यामुळे सदर सांडपाणी भूमिगत गटार योजनेत सोडण्यात येऊ नये.. तसेच.. असे पुन्हा केल्याचे आढळून आल्यास आपणाकडून महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती अधिनियम 1965 अन्वये दंड वसूल करण्यात येईल व आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच.. सदर चिलिंग प्लांट संदर्भात घेण्यात आलेल्या विविध ना हरकत परवानग्यांची प्रत पुढील सात दिवसात या कार्यालयात सादर करण्यात यावी असेही या दुसऱ्या नोटिस मध्ये मुख्याधिकारी यांनी म्हंटले आहे.
या विषयी बोलतांना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, देवळाली प्रवरा शहरातील नागरीकांना त्रास होईल असे काम करणारा कुणी कीतीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. नागरी वस्तीत असलेल्या या अनधिकृत चिलिंग प्लांट मूळे जवळ्पासच्या नागरीकांना ध्वनी प्रदुषण.. तसेच, जल प्रदूषण तसेच वायू प्रदूषणसह वाहतुकीचा प्रश्न आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरच प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अन्न व औषध प्रशासन यासह संबंधित सर्व संबंधित शासकीय कार्यालयाकडे या प्लांट ची तक्रार केली जाणार आहे. व आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याने हा प्लांट नगरपरिषदेने कारवाई करुन पाडण्यापूर्वी त्या अनधिकृत प्लांटला दुध पुरवठा करणाऱ्या शेतकरी बांधव व छोटे मोठे दुध संकलन केंद्र चालकांनी आपले दुध जवळ्पासच्या मान्यताप्राप्त चिलिंग प्लांटला किंवा आपापल्या सोईच्या प्लांटला सुरू करून भविष्यात होणारे आपले आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन प्रसंगी बोलताना ढूस यांनी केले व सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments