श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी लहू कानडे यांचा पत्ता कट
हेमंत ओगले यांना उमेदवारी जाहीर
राहुरी ( प्रतिनिधी )
श्रीरामपूर विधानसभे साठी श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहु कानडे यांना काॅगेस उमेदवारी डावलून काँग्रेस नेतृत्वाने युवा नेता हेमंत ओगले त्यांना उमेदवारी जाहीर केले आहे .
काॅगेसची अधिकृत उमेदवारी हेमंत ओगले यांना जाहीर झाल्याने श्रीरामपूर मतदार संघात ओगले समर्थकांसह ससाणे गटात आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के सी वेणू गोपाल यांनी महाराष्ट्रातील 28 उमेदवारांची यादी आज जाहीर केली . त्यात नगर जिल्ह्यातील दोन काँग्रेस उमेदवारांचा समावेश आहे . शिर्डी मतदार संघासाठी गणपतराव आप्पासाहेब पाटील यांची उमेदवारी तसेच श्रीरामपूर मतदार संघासाठी हेमंत ओगले यांची उमेदवार जाहीर झाली आहे .
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची हेमंत ओगले यांची असणारी मैत्री सर्वश्रुत आहे . तसेच विद्यमान काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्या मतदार संघातील मतदारांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती .
Post a Comment
0 Comments