नगर जिल्ह्यात युवा मतदारांवरच राहणार युवा उमेदवारांची भिस्त
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरीसह नगर जिल्ह्यातील राजकारण जेष्ठांवरून मुला बाळांच्या अर्थात युवा पिढीकडे गेल्या काही वर्षात गेले आहे . याच काळात हजारो युवा मतदारांवरच विधानसभेतील संभाव्य उमेदवारांची भिस्त राहणार आहे का ! अशा चर्चा सुरू झाल्या आहेत .
(Advt)
काही वर्षांपूर्वी जुन्या पिढीतील (कै) बाळासाहेब विखे पाटील , डॉ . दादासाहेब तनपुरे , शंकरराव काळे , शंकरराव कोल्हे , भाऊसाहेब थोरात , यशवंतराव गडाख , राजळे , बबनराव ढाकणे , मधुकर पिचड आदी नेत्यांभोवती फिरायचे . या राजकीय ऊर्ध्वयु ची नंतरची पिढी नंतर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होती .
( जन हितार्थ )
गेल्या सात - आठ वर्षात तिसऱ्या पिढीच्या युवा नेत्यांनी राजकारणाची कळसूत्री जणू हाती घेतल्याचे चित्र दिसून येत असून नव्या युगातील नव आव्हानांना सामोरे जात याच युवा नेत्यांची पावले महाराष्ट्राच्या विधानसभेकडे येऊन ठेपल्याचे सध्याचे चित्र आहे .
( Advt )
नव्या पिढीतील युवा नेते राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे , मा खा सुजय विखे , संगमनेरच्या जयश्रीताई थोरात , अकोल्याचे वैभव पिचड , कोपरगावचे आशुतोष काळे , विवेक कोल्हे , नेवासाचे शंकरराव गडाख , पाथर्डीच्या मोनिकाताई राजळे , नगरचे संग्राम जगताप अशी विविध नावे घेता येईल .
यंदा 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून तनपुरे , विखे , थोरात , गडाख , काळे , कोल्हे , जगताप तसेच संगमनेरच्या जयश्री थोरात या युवा पिढीतील नेत्यांची नावे पुढे आली असून या मातब्बर युवा नेत्यांपैकी काही नावे विविध पक्षांनी उमेदवार म्हणून जाहीर देखील केली आहेत .
गेल्या सात आठ वर्षांच्या काळात हजारो युवापिढीने नव मतदार म्हणून नावे नोंद केलेली आहेत . मतदार संख्या देखील वाढत आहेत . याच युवा मतदारांना मतदान व भविष्यातील भारत कसा असावा , नेतृत्व कसे असावे या भावना वाढीस जात असल्याने नगर जिल्ह्यातील पुढील विधानसभेचे लोकप्रतिनिधी नव्या युवा पिढीसाठी कसे पथदर्शी ठरतील ? त्यावरच सर्व विधानसभा निवडणुकीची भिस्त अवलंबून असून याच युवा मतदारांकडे विविध राजकीय पक्षांनी सध्या तरी लक्ष वेधल्याचे चित्र दिसून येत आहे .
Post a Comment
0 Comments