Type Here to Get Search Results !

नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यावर राहुरीत गुन्हा दाखल

 नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या धनराज गाडे यांच्यावर गुन्हा



राहुरी ( प्रतिनिधी )

 राहुरी विधानसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण तापले असतानाच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे यांच्यावर निवडणूक विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रवीण बागूल यांनी याबाबत तक्रार दाखल केली .




माजी आमदार शिवाजी कर्डिले हे २४ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्यासाठी आले असता त्यांच्या समवेत तीन जण होते. त्यानंतर गाडे निवडणूक कक्षात जाण्यासाठी आले. त्यांना पोलिस कर्मचारी बागूल व भांड यांनी थांबविले. मी नामनिर्देशन प्रक्रियेसाठी आलेलो नाही. माझे निवडणूक अधिकाऱ्यांकडे काम आहे, असे सांगत गाडे यांनी कक्षात प्रवेश केला. त्यानंतर नामनिर्देशन करताना फोटो काढला. 

निवडणूक विभागाने संबंधित प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज व फोटो दिला आहे. त्यामध्ये गाडे यांना पोलिस आत जाण्यास मनाई करत असतानाही ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात दाखल झाले. 

याबाबत निवडणूक विभागाने पोलिस प्रशासनाला कारवाईचे पत्र दिले होते. त्यानुसार गाडे यांच्यावर निवडणूक आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments