Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात एक लाखाहून अधिक संघविस्तार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या

 शताब्दी वर्षात एक लाखाहून

 अधिक शाखा विस्तार



 "आधुनिक विकासासोबत ‘स्व’आधारित

 जीवनशैली अंगीकारायला हवी" -

 सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे 

 


मथुरा - ( विश्व संवाद केंद्र द्वारा आभार )

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीचा शनिवारी समारोप झाला. मथुरा येथे आयोजित या बैठकीच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले .




🔹 कार्यकारी मंडळाच्या बैठकीत यंदा मार्चमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वर्षी 99 वर्ष पूर्ण करून शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. 



आगामी विजयादशमीला कोणते कार्यक्रम करायचे आहेत, यावर विचार करण्यात आला. स्वयंसेवक पंच परिवर्तनाचे  


( स्व आधारित जीवनशैली, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि नागरिक कर्तव्य )  विषय घेऊन समाजात जातील. समाजात परिवर्तन कसे होईल, याची चिंता स्वतः करायची आहे, असे सरकार्यवाह होसबाळे यांनी सांगितले.

 ते म्हणाले, की शाखा हे संघकार्याचे प्राथमिक एकक आहे. कार्यविस्ताराच्या दृष्टीने 45, 411 स्थानी 72,354 शाखा चालू आहेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 3626 स्थानांची वाढ झाली असून 6645 शाखा वाढल्या आहेत. 

तसेच आठवड्यात होणाऱ्या  साप्ताहिक मिलन 29369  असून यामध्ये 3147 एवढी वार्षिक वाढ झाली आहे. जेथे शाखा भरत नाही, तेथे मासिक संघ मंडलीचे कार्य चालते. या वर्षी 11,382 संघमंडळी असून यामध्ये 750 स्थानांची वाढ झाली आहे. अशा एकूण 1,13,105 युनिट्स स्वरूपात सध्या संघकार्याचा विस्तार आहे.

 संघ कार्यकर्त्यांच्या चरित्रनिर्माणाचे कार्य करतो. चरित्रनिर्माणाची ही पद्धत केवळ चर्चेपुरती नाहीत तर आचरणात दृगोचर झाली पाहिजे आणि 

'स्व'चे कार्य हे मातीच्या सुगंधाचे काम आहे. महात्मा गांधींनीही *स्वराज्य* असं म्हटलं होतं. 'स्व' म्हणजे 'स्वातंत्र्य', राष्ट्रीय अस्मिता. 

इथे आपल्याला आपल्या परंपरेनुसार, आपल्या सभ्यतेला, त्यातील अनुभवांना अनुसरून वागावे लागेल, आधुनिकतेचे पालन करावे लागेल, आधुनिकतेतही आपण 'स्व' विसरता कामा नये, असे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले.

 ते म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे हे 300 वे वर्ष आहे. सामाजिक प्रबोधन, मंदिरांचा जीर्णोद्धार, कार्यक्षम प्रशासन चालविणे यातून हे दिसून येते, की 300 वर्षांपूर्वीही मातृशक्ती लोकांसाठी आणि लोककल्याणासाठी शासन करण्यास सक्षम होती.

 बांगलादेशातील अलीकडच्या घडामोडींवर  ते म्हणाले की, हिंदू समाजाने तेथून स्थलांतर करण्याची गरज नाही. त्यांनी तिथे उभे रहावे, ती त्यांची भूमी आहे, बांगलादेशात आमची शक्तीपीठे आहेत.

हिंदू हे जगभरात राहतात. जिथे जिथे संकट येते तिथे हिंदू भारताकडे पाहतात, असे ते म्हणाले.


श्रीकृष्णजन्मभूमीच्या विषयावर ते म्हणाले की, हे प्रकरण न्यायालयात आहे, न्यायालय निर्णय घेईल. अयोध्येप्रमाणे यावरही काही करण्याची गरज नाही, समाज ठरवेल. आम्ही समाजासोबत आहोत.



Post a Comment

0 Comments