विधानसभेसाठी राहुरीत भाजपाकडून पुन्हा कर्डिले
राहुरी ( प्रतिनिधी )
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने महाराष्ट्रातील विधानसभेसाठी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली
असून या यादीत राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा नावाचा समावेश असल्याने कर्डिले समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .
गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी चे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात भाजपाकडून कोण उभे राहणार यावर चर्चा रंगल्या होत्या . अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करत असल्याच्या चर्चाही होत होत्या .
कर्डिले विरुद्ध तनपुरे अशी गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेसाठी लढत रंगलेली दिसून आलेली आहे . माजी आमदार शिवाजीराव कर्डिले दोन वेळा राहुरीचे आमदार राहिलेले आहे , तर विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आमदारकीची एक टर्म पूर्ण केली आहे .
येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेचे मतदान होणार असल्याने घोडा मैदान समोरच आहे , असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात असताना भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव जाहीर करतात त्यांच्या समर्थकांमध्ये राहुरी पाथर्डी, नगर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खरी रंगत आता पुन्हा एकदा कर्डिले विरुद्ध तनपुरे अशीच राहणार असल्याने राहुरी विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे .
Post a Comment
0 Comments