राहुरीतील या संस्थेला आता
बहिर्जी नाईक नाव जोडले
जाणार
राहुरी ( प्रतिनिधी )
राज्यातील 106 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय यांना समाज सुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याच्या निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला .
त्यानुसार नगर जिल्ह्यातील चार प्रशिक्षण संस्थांचा यात समावेश असून राहुरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय चा देखील समावेश असून आता राहुरीच्या आयटीआय ला बहिर्जी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखले जाणार आहे .
राहुरीतील आयटीआय माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पाठपुराव्यामुळे यापूर्वीच राज्य सरकारने मंजूर केलेले आहे . सध्या तनपुरे यांच्याच पाठपुराव्याने राहुरी स्टेशन लगतच आयटीआयचे संस्था असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे तांत्रिक विषयांचे प्रशिक्षण दरवर्षी विद्यार्थी घेतात .
राज्य सरकारने आयटीआयचे नामकरण समाज सुधारक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावे देण्याचा निर्णय घेतल्याने नगर जिल्ह्यातील राहुरीच्या आयटीआयचे बहिर्जी नाईक आयटीआय , पारनेर तालुक्यातील आयटीआय चे सेनापती बापट आयटीआय , नेवासा तालुक्यातील आयटीआय चे संत ज्ञानेश्वर महाराज आयटीआय तर पाथर्डी तालुक्यातील आयटीआयचे नाव आता संत भगवान बाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय असे होणार आहे .
Post a Comment
0 Comments