Type Here to Get Search Results !

'Trumpet' ऐवजी तुतारी नव्हे तर ट्रंपेट अचानक आलेल्या निवडणूक आयोगाच्या आदेशाची चर्चा

 'Trumpet'  ऐवजी तुतारी नव्हे तर ट्रंपेट

अचानक आलेल्या निवडणूक आयोगाच्या आदेशाची चर्चा



सतर्क खबरबात टीम - विशेष वृत्त




महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी साठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये Trumpet  या मुक्त चिन्हाचे मराठी नाव तुतारी ऐवजी ट्रंपेट याप्रमाणे सुधारित करण्याबाबत आदेश राज्याचे   उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी एम आर पारकर यांनी आज काढले आहेत . 

विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर दोन दिवसांनी हा आदेश निघाला आहे . या आदेशाप्रमाणे विधानसभा निवडणुकीतील निवडणूक तक्त्यांमध्ये इंग्रजी  Trumpet या मुक्त चिन्हाचे मराठी नाव तुतारी ऐवजी ट्रंपेट हे याप्रमाणे राहणार असल्याचे आदेश आहेत .




223 राहुरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी आज सायंकाळी उशिरा या निर्णयाची माहिती प्रसार माध्यमांना द्वारे दिली आहे .

अचानक आलेल्या या राज्याच्या निवडणूक आयोगाकडून आलेल्या माहिती बाबत संभ्रम व चर्चा सुरू झाल्या आहेत .

Post a Comment

0 Comments