विधानसभेसाठी राहुरीत 13 उमेदवार रिंगणात : उमेदवारांची संख्या जास्त असल्याने डोकेदुखी वाढणार
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी तेरा उमेदवारांपैकी तीन नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार , पाच मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार तर पाच अपक्ष उमेदवार असे तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत .
( प्रोप्रायटर - अक्षय गोविंद उंडे - 9766464775 - राहुरी बस स्टॅन्ड शेजारी , राहुरी ) advt
( इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स साहित्यासाठी विश्वसनीय नाव ) advt
विशेष म्हणजे या 13 उमेदवारांपैकी दोन प्रमुख उमेदवार व एक अन्य वगळता सोडता वर्ग अन्य दहा उमेदवार मराठेतर समाजाचे आहेत हे विशेष आहे .
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 22 पैकी नऊ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले . आता विधानसभा निवडणुकीसाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून
( प्रसाद मैड- 8380091497 तनपुरे कॉम्प्लेक्स , प्रगती विद्यालय , राहुरी . )
( दिनेश औटी ( गुरु ) - संपर्क - 8788421193 )
(कनक आभूषण (ज्वेलर्स) संपर्क - मुकुंद बुराडे - 9975393530)
त्यातील तीन उमेदवार राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे असून अन्य पाच उमेदवार नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार ( राष्ट्रीय व मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवाराव्यतिरिक्त ) अन्य उमेदवार आहेत तर अन्य पाच अपक्ष उमेदवार आहेत .
उमेदवार व त्यांना मिळालेली चिन्ह
1) शिवाजी भानुदास कर्डिले - भाजपा - कमळ
2) प्राजक्त प्रसादराव तनपुरे - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष - तुतारी वाजवणारा माणूस
3 ) ज्ञानेश्वर दत्तात्रय गाडे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना - रेल्वे इंजिन
4 ) अनिल भिकाजी जाधव - वंचित बहुजन आघाडी - गॅस सिलेंडर
5 ) जयेष साहेबराव माळी - एल्गार पार्टी - पाण्याची टाकी
6 ) प्रदीप प्रभाकर मकासरे - रिपब्लिकन पार्टी - बॅट
7 ) म्हसे साहेबराव पाटीलबा - महाराष्ट्र स्वराज्य पार्टी - पेनाची निब सात किरणांसह
8 ) सिकंदर बबन ईनामदार - आझाद समाज पार्टी कांशीराम - किटली
9 ) अरुण भागचंद्र तनपुरे - एअर कंडिशनर
10 ) अल्ताफ इब्राहिम शेख - टेबल
11 ) इमरान नबी देशमुख - खाट
12 ) डॉ. जालिंदर घिगे - शिट्टी
13 ) दीपक विठ्ठल बर्डे - कपाट
अशी तेरा उमेदवारांची नावे आहेत . उमेदवारांची संख्या जास्त असल्याने खऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंगत चढली असल्याचे चित्र आहे .
223 राहुरी विधानसभा मतदारसंघातील या 13 उमेदवारांच्या नावाची यादी आज निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी जाहीर केली आहे त्यांना सहाय्यक म्हणून राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील व संबंधित अधिकारी निवडणूक यंत्रणेत लक्ष घालून आहे .
Post a Comment
0 Comments