राहुरी नगर पाथर्डी मतदारसाठी 308 मतदान केंद्रांवर 140 वाहनांतून साहित्य पोहोच ; उद्याच्या मतदानाकडे सर्वांचेच लक्ष
टीम - सतर्क खबरबात जिल्ह्याची
223 राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून
308 मतदान केंद्रासाठी 140 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे .
राहुरी विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्र संख्या - 308 इतकी असून
पुरुष मतदार संख्या - 168065 , स्त्री - 155993 , इतर - 01 एकूण - 324059 मतदार संख्या आहे.
राहुरी नगर पाथर्डी मधील मतदान केंद्रांवर साहित्य नेणे व आणण्यासाठी एकूण 140 वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून त्यात - बस ४२, जीप 13, कुझर 8, मिनी बस -12, सेक्टर अधिकारी - 28, क्यु. आर.टी. 07, एकूण 140 वाहने व्यवस्था करण्यात आली आहे .
निवडणूक कामी एकूण पथके - 308 असून एका पथकात 06 अधिकारी व कर्मचारी ( 01 मतदान केंद्राध्यक्ष , 01 मतदान अधिकारी क्र. 1.02 इतर मतदान अधिकारी , 01 पोलीस कर्मचारी , 01 शिपाई ) असतील.
मतदान केंद्राच्या आंत मोबाईल वापरण्यास बंदी आहे . मतदारांना मतदार यादीत नांव शोधण्यासाठी - https://electoralsearch.eci.gov.in/ असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर ग्रामपंचायत मार्फत व्हील चेअर्स देणार आहे. मतदान केंद्रावर वैधकीय पथक (आशा वर्कर ) तसेच महिला मतदारांना मदतनीस म्हणून अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सांयकाळी 6.00 वाजेपर्यंत. निवडणूक ओळखपत्र म्हणून व्यतरिक्त विविध प्रमाणे 12 ओळखपत्र मतदारांची ओळख पटविण्यासाठी वापरण्यात येतील . मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे .
Post a Comment
0 Comments