Type Here to Get Search Results !

त्या 144 जणांसाठी दोन दिवस सहा पथके राहणार तैनात

त्या 144  जणांसाठी  दोन  दिवस

 सहा  पथके  राहणार  तैनात







सतर्क खबरबात टीम  -  विशेष वृत्त 

निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिव्यांग व 85 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मतदारांसाठी गृहमतदानाची सहमती दर्शविल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात

144  मतदारांसाठी दोन  विशेष पथके  तयार  करण्यात 
आली आहेत .



राहुरी मतदारसंघात गृहमतदानासाठी गुरुवार दि. 14 व शुक्रवार दि. 15 रोजी मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी दिली . त्यांनी सांगितले की , दोन दिवस होणाऱ्या या प्रक्रियेसाठी सहा पथके तयार करण्यात आली असून


 या पथकात दोन मतदान अधिकारी ( पोलिंग ऑफिसर ) , एक सूक्ष्म निरीक्षक ( मायक्रो ऑब्झर्वर ) , पोलीस , व्हिडिओग्राफर , मदतनीस , असणार आहेत असे त्यांनी सांगितले . संबंधित उमेदवारांच्या  प्रतिनिधींना देखील याबाबत कळविण्यात आले आहे .

राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरी , नगर , पाथर्डी तालुक्यातील 144 नागरिकांनी गृह मतदानासाठी सहमती दर्शवली आहे . यामध्ये 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 122 मतदार तर 22 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे . जर नमूद केलेल्या तारखेला संबंधित मतदार उपलब्ध नसेल तर 16 तारखेला त्या मतदाराचे मतदान करण्यात येईल , अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी माहिती दिली . निवडणूक विभागाने दिनांक 14 व 15 रोजी ची संपूर्ण तयारी केली आहे .
दरम्यान राहुरी विधानसभा मतदारसंघातील 307  मतदान केंद्रावरील मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक विभागाकडून वोटर स्लिप देण्यात आली असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या वोटर स्लिप मतदारांच्या घरोघरी पोहोच करण्याची जबाबदारी मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे . या वोटर स्लिप वर मतदान केंद्र , मतदाराचे नाव , याशिवाय मतदान केंद्राच्या नकाशा देखील असल्याने मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी सोपे पडणार आहे . एकूणच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे .

Post a Comment

0 Comments