लोकसभेत राज्यात 31 खासदार निवडत भाजप विचाराचा पराभव केला - शरद पवार
राहुरीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचार सभेत शरद पवारांचा विरोधकांना इशारा
राहुरी ( प्रतिनिधी )
लोकसभा निवडणुकीत 400 पार घोषणा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चा डाव महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना करून राज्यात 31 खासदार निवडत भाजपच्या विचाराचा पराभव करण्याचे काम केले ,
असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील जाहीर सभेत केले.
राहुरी नगर पाथर्डी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचार सभेत श्री पवार बोलत होते . या वेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा जिल्ह्याचे नेते राजेंद्र फाळके , दादाभाऊ कळमकर , सलगर ताई , बाळासाहेब हराळ , सुरेश वाबळे आदीसह
यावेळी शरद पवार म्हणाले की , सध्याचे सरकार लाडक्या बहिणींना खुश करत असताना गेल्या सहा महिन्यात सहा हजारहून अधिक महिला , भगिनींवर अपहरण , अत्याचार झालेल्या घटना घडलेल्या आहेत . तसेच गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचा कळकळ व कळवळा करणाऱ्या या महायुती सरकारच्या काळात 1800 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत . महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेंचे सरकार याच सरकारने पाडले . विपक्ष फोडणे व सरकार स्थापने हेच या देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महायुती शासनाचे काम आहे . पक्ष उभा करायला आयुष्य लागते , परंतु पक्ष फोडण्यासाठी काही लागत नसल्याचा शेलका टोला पवार यांनी लगावला .
सध्या दररोज महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी दिवसभर सभा घेत असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांनी यांना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच मंत्रिमंडळात जी संधी दिली , त्याचे सोने प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदार संघातच नव्हे तर चंद्रपूर सारख्या दुर्गम ठिकाणी केल्याचे आवर्जून पवार यांनी सांगितले . तनपुरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले .
राहुरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की , 2019 मध्ये मला काम करण्याची संधी जनतेने दिली . 70 वर्षात पहिल्यांदा राहुरीला मंत्री मंडळाची संधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली . ऊर्जा खाते सारखे महत्त्वाचे खाते सरकार येण्या अगोदर नवीन वीज कनेक्शन , डीपी यासाठी काहीही झाली नाही , कोणत्याही योजना नव्हत्या . कृषी धोरण 2020 आणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात यास निधी उपलब्ध देऊन सहा नवीन सबस्टेशन , सबस्टेशन व डि पी यांची क्षमता वाढ आपण आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात दिल्याचे सांगितले . कोरोना काळातही मंत्रीपद असताना अहोरात्र राहुरीतील अनेक धोरणांचा विकासाची गंगा आणण्याची आपण काम केले . आपल्या कामाबाबत समोरच्या विरोधकांमध्ये ( कर्डिले) बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याचे म्हणत वांबोरीसाठी केवळ विरोधकांनी बटणे , कळ दाबण्याचे काम केले. आपण 680 एमसीएमटी पाण्याचे नियोजन असताना टेल पर्यंत म्हणजेच शेवटच्या भागापर्यंत पाणी येण्यासाठी वांबोरी चारीला प्रसंगी एक टीएमसी पर्यंत पाणी देण्याचे काम केले .
कृषी सौर कृषी वाहिनी योजनेत अंतर्गत बाभूळगाव वरवंडी धामोरी आदी कामांसाठी दिवसा वीज घेण्याचे काम केले . गेल्या दहा वर्षात ठळक काम सांगण्याचे विकास काम सांगण्यासाठी विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याचे यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले . याची जिरव त्याची जिरव करतच दहा वर्ष विरोधकांनी काम केल्याचे हे आरोप प्राजक्त तनपुरे यांनी केला . यावेळी मोठ्या संख्येने नागरिक मतदार उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments