Type Here to Get Search Results !

राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणारे खंडणीखोर कसे वाटत होते

 राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणारे खंडणीखोर कसे वाटत होते श्रीरामपूरचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा सवाल






श्रीरामपूर - खबरबात टीम

अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणारी स्वयंसेवक ज्यांना खंडणीखोर वाटत होते ते महायुतीचे उमेदवार कसे होऊ शकतात? असा प्रश्न शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उपस्थित केला.








श्रीरामपूर शहर व तालुक्यात तसेच राहुरी तालुक्यात हिंदुत्वाला मानणारा मोठा वर्ग आहे, तो जातीयवादी विचारसरणी असलेल्या व्यक्तीला स्वीकारणार नाही, असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.




जागा वाटपात महायुतीमध्ये माजी आ.भाऊसाहेब कांबळे शिवसेनेकडून व आमदार लहू कानडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला. महायुतीची उमेदवारी दोघांपैकी नेमकी कुणाला याबाबतचा संभ्रम शेवटपर्यंत राहिला. 


 या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार कांबळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी त्यांनी मला विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला राम मंदिरासाठीच्या वर्गणीला खंडणी म्हणून हिणावणारा हिंदुत्वाचा उमेदवार कसा ?




काँग्रेसमध्ये उमेदवारी तापल्याची नामुष्की आलेल्या आमदार कानडे यांच्यावर त्यामुळे महायुतीकडे येण्याची वेळ आली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना नाकारले. मात्र महायुतीतील इतर मित्र पक्षांची दिशाभूल करून त्यांनी उमेदवारी मिळविण्याचा घाट घातला. त्यांना उमेदवारी मिळाली तरी ते हिंदुत्वाची विचारसरणी असलेल्या महायुतीचे उमेदवार म्हणून जनता त्यांना स्वीकारणार नाही. प्रभू श्रीरामांचे आयोध्येमध्ये मंदिर निर्माण होत असताना स्वयंसेवकांनी जमा केलेल्या वर्गणीचा उल्लेख ज्यांनी खंडणी म्हणून केला, त्यांचा हिंदुत्वाशी संबंध काय? असा सवाल कांबळे यांनी उपस्थित केला. जनता मतदानातून त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही यावेळी बोलताना कांबळे यांनी व्यक्त केला. शिवसैनिकांनी आणि हिंदुत्व विचारसरणी जोपासणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मनामध्ये कुठलीही शंका न आणता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रचार शुभारंभ आज बुधवारी करण्यात आला आहे 









Post a Comment

0 Comments