साकुरला भर दुपारी सराफ दुकानावर बंदुकीचा धाक दाखवत पडला दरोडा ; नगर जिल्ह्यात खळबळ
संगमनेर - सतर्क खबरबात टीम
भर दुपारी पठार भागातील साकुर पेठेत कान्हा ज्वेलर्स या सराफ दुकानावर पाच ते सहा दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स मधील लाखो रुपयांच्या सोन्याची लूट केल्याची घटना आज सोमवारी दि. 11 नोव्हेंबरला घडली .
या घटनेमुळे संगमनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे . भर दुपारी घडलेल्या घटनेनंतर संगमनेर पोलीस या दरोडेखोरांच्या मागावर आहेत .
याविषयी समजलेल्या माहितीनुसार , संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध व समृद्ध मानल्या जाणाऱ्या पठार भागातील साकुर बाजारपेठेत कान्हा ज्वेलर्स या सराफी दुकानात दुपारी दीडच्या सुमारास कान्हा ज्वेलर्स मधील सराफ एका ग्राहकासंघ चर्चा करत असताना अचानक काचेच्या दरवाजा उघडून चार ते पाच दरोडेखोर दुकानात शिरले . सराफाला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सोन्याचे लावलेले ट्रे मधील सोने पिशवीत भरण्यास सुरुवात केली . याच वेळी दुकानाबाहेर दोन दरोडेखोर उभे असल्याचे प्रत्यक्ष दर्शन कडून सांगण्यात आले . हा प्रकार घडताना दुकानाबाहेर बघ्यांची गर्दी झाली तरी कोणाची पुढे आले नाही , काळे ट्रॅकर व तोंड झाकलेल्या या चार पाच ते सहा जणांनी लुटलेले सोने पिशवीत भरून दुकान बाहेर आल्यावर त्यातील एकाने दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केल्याचेही वृत्त हाती आली आहे . या दरोडेखोरांनी दोन दुचाकी वर पारनेर रस्त्याकडे पळ काढण्याची सांगण्यात आले .
घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दिगंबर भदाणे , संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांनी फौज फाट्यासह साकुर मध्ये दाखल होत दरोडेखोरांचा उशिरापर्यंत पाठलाग केल्याची माहिती ही उशिरापर्यंत समजली होती .
भर दुपारी साकुर सारख्या पठार भागात सराफ दुकानावर दरोडा पडल्याने संगमनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे . दरोडेखोरांना पकडण्याची आव्हान नगर जिल्हा पोलिसांसमोर उभे राहिले आहे .
Post a Comment
0 Comments