Type Here to Get Search Results !

राहुरी कृषी विद्यापीठाच्या निवृत्ती वेतनधारकांना खुशखबर

राहुरी कृषी विद्यापीठाच्या निवृत्ती वेतनधारकांना खुशखबर


राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाच हजार निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला देण्याचा मार्ग सुकर



राहुरी ( विशेष वृत्त )

महात्मा फुले कृषी विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये हयात असल्याचा दाखला कृषी विद्यापीठात येऊन जमा करावा लागतो .




विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना समक्ष उपस्थितीबाबत मोठा दिलासा दिला आहे . 



विद्यापीठाच्या या निर्णयामुळे सुमारे ५ हजार निवृत्तीवेतनधारकांना फायदा झालेला आहे . विद्यापीठाचे सर्व निवृत्तीवेतनधारक पुणे,कोल्हापूर, धुळे, आणि राहुरी यांना हयातीचा दाखला जमा

           करण्याकरिता कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रत्यक्ष येणे आवश्यक नसून निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेत निवृत्तीवेतन घेत आहेत , त्या बँकेत जाऊन आपले ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आदी ओळख पटवून विद्यापीठाने पाठविलेल्या बँक यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठा द्यावा . 

ज्या निवृत्ती वेतनधारकांना प्रत्यक्ष बँकेत जाणे शक्य नसेल अशा निवृत्तीवेतनधारकांनी विविध नमुन्यांतील साक्षांकन केलेला हयातीचा दाखला देखील स्वीकारला जाईल असे सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments