जाती-धर्मात भेद करून सत्ता मिळविण्याचा भाजपाचा डाव - बाळासाहेब थोरात
राहुरी ( प्रतिनिधी )
राज्यामध्ये महागाई , युवकांच्या रोजगाराचा प्रश्न , तरुणांना नोकर्या मिळत नाही , त्यामुळेच हे लक्ष विचलित करून जाती-धर्मात भेद करून 'बटेंगे तो कटेंगे' नारा देत सत्ता मिळवण्यासाठी भाजपा राजकारण करू पहात असल्याचा आरोप काँग्रेसनेते माजी महसूल मंञी बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
ब्राह्मणी येथील बाजार तळावर महाविकास आघाडीचे उमेदवार आ. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये बाळासाहेब थोरात बोलत होते.
ते म्हणाले की, जाती-धर्मात भेद निर्माण करून शेतकरी तसेच बहुजनांच्या युवकांचे माथे भडकून त्यांना दंगली करायला लावायच्या अन् त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे काम सध्या देशात तसेच राज्यात सुरू आहे. देशाच्या पंतप्रधानांनी , मुख्यमंञ्यांनी देश कसा चालवायचा यावर बोलले पाहीजे. माञ लक्ष विचलित करून अराजकता माजविण्याचा प्रकार सध्या सर्वत्र सुरू आहे.
देशात तरूणांना रोजगार कसा मिळेल, कल्याणकारी योजना कशा चालेल यावर काॅग्रेस नेते राहुल गांधी काम करत आहेत. दुसरीकडे माञ निवडनुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या योजना सुरू करून केवळ घोषणाबाजी करणा-या पंतप्रधानांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यांच्या घोषणा म्हणजे 'चुनावी जुमला' होता असा टोलाही त्यांनी लगावला.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणीला तीन हजार रूपये महिना, शेतक-यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, पन्नास हजार रूपये प्रोत्साहन, २५ लाखांपर्यंत आरोग्य जीवनदायी विमा योजना, बेरोजगार युवकांना चार हजार रूपये महिना अशा कल्याणकारी योजना सुरू करणार आहे. जात निहाय जनगणना करून उपेक्षित घटकांना आरक्षण देण्याचे काम भविष्यात केले जाणार आहे. प्राजक्त तनपुरे हे नशीबवान आहेत की, ते पहिल्यांदाच मंञी झाले. त्यांच्या मंञीपदाच्या काळात त्यांनी जिल्हात तसेच राज्यातही नेञदिपक कामगिरी केली. असे लोकप्रतिनिधी लाभले देखील आपले भाग्यच आहे. म्हणून त्यांना विधासभेत पाठवायची आपली जबाबदारी आहे.त्यानंतर ते नक्कीच आपल्या मतदारसंघातील चेहरा-मोहरा बदलतील अशी अपेक्षा यावेळी थोरात यांनी व्यक्त केली.
आ.प्राजक्त तनपुरे बोलताना म्हणाले की, शेतमालाचे भाव मातीत घालण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. २०२३ चा पिक विमा मार्च महिन्यात शेतक-यांना मिळने अपेक्षित होते.माञ युती सरकारने दिरंगाई करून निवडणूकीच्या तोंडावर ह्या पिक विम्याचे पैसे दिले. विधासभेत आम्ही विरोधी पक्षातील आमदारांनी याप्रश्नी सरकारला धारेवर धरण्याचे काम केले होते. सभागृहात तसेच कृषी अधिका-यांच्या दालनात देखील सात्यताने आंदोलने केली म्हणून सरकारवर दबाब आला अन् अखेर त्यांनी शेतक-यांना पिक विम्याचे पैसे दिले. म्हणून शेतकरी विरोधी असलेल्या युती सरकारला शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे माञ आपल्या जिल्हा बॅकेची अवस्था वाईट झालेली आहे. समोरचे उमेदवार जातील तेथे तरूणांना नोकरीला लावण्याचे खोटे आश्वासन देत आहे. परंतु दहा दिवसात हे सरकार जाणार आहे. जिल्हा बॅकेचा चेअरमन देखील बदलणार आहे. नोकरी भरती हि पारदर्शक पद्धितीने करून सर्व सामान्य-गोर गरीब तरूणांना या नोकर भरतीत समान संधी दिली जाईल असे आ.तनपुरे म्हणाले.
Post a Comment
0 Comments