Type Here to Get Search Results !

उद्धव सेनेचे सर्व शिवसैनिक प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी - जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे


उद्धव सेनेचे सर्व शिवसैनिक प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी - जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे



राहुरी ( प्रतिनिधी )



माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरेंसारख्या सुसंस्कृत, निष्कलंक व सर्वांना सोबत घेत विकासात्मक कामे करणाऱ्या उमेदवाराला पाठबळ देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.

 मतदारसंघातील प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या पाठिशी असून गद्दारी करीत पक्ष व चिन्ह चोरणाऱ्यांना व पक्ष फोडण्यासाठी काळे मनसुबे आखणाऱ्यांना जनता जागा दाखविणार , असा इशारा शिवसेना उबाठा पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी महायुतीला दिला.

बारागाव नांदूर ( तालुका - राहुरी ) येथील छत्रपती शिवाजी चौक येथे आयोजित सभेत खेवरे बोलत होते. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब गाडे होते. खेवरे म्हणाले, राहुरी मतदारसंघात भाजपने अनेक गुन्हे दाखल असलेला उमेदवार दिला आहे. तर महाविकास आघाडीकडून उच्चशिक्षित, निष्कलंक, सुसंस्कृत व विकासात्मक व्हिजन असणारे आ. तनपुरे यांना
उमेदवारी दिली आहे. गुन्हे दाखल असलेला आमदार करायचा की विकासात्मक कामे करणारे उच्चशिक्षित आमदार तनपुरे यांना मताधिक्य द्यायचे, याबाबत राहुरी मतदारसंघातील मतदार नक्कीच विचार करून आ. तनपुरे यांच्या रुपात तनपुरे यांना राहुरी विधानसभा मतदारसंघात विजयी करत महाविकास आघाडीच्या येणाऱ्या सत्तेत पहिला कॅबिनेट मंत्री मंत्रालयात
पाठविणार , असा दावा खेवरे यांनी केला.
हिंदुत्वाच्या नावावर भाजप आता मते मागत आहे; परंतू हिंदुत्व हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे असते. जाती- धर्मामध्ये फूट पाडत स्वहित जपायला हिंदुत्व म्हणत नाही.

यावेळी नांदूर सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वास पवार यांनी गावातील विविध कामांसाठी १७ कोटीचा निधी दिल्याचे सांगितले. याप्रसंगी सेना तालुकाप्रमुख सचिन म्हसे, भाऊसाहेब गाडे, डॉ. ज्ञानेश्वर आघाव, नवाज देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपिठावर जालिंदर गाडे, विलास शिरसाठ, खतीब देशमुख, वसंत गाडे, दिलीप कोहकडे, हमीद इनामदार, सुनिल शेलार, हमीद पटेल, कैलास कोहकडे, डॉ. संजय म्हसे, सुभाष गोपाळे, किशोर कोहकडे, श्रीराम गाडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष विलास गाडे, उपाध्यक्ष न राजेंद्र गाडे, सरपंच प्रभाकर गाडे, मुळाखोरे दुध संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ गाडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments