Type Here to Get Search Results !

आ. प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या खुल्या चर्चेचे केलेले आव्हान स्वीकारा - सभापती अरुण तनपुरे यांचे कर्डिलेंना आवाहन

आ. प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या खुल्या चर्चेचे केलेले आव्हान  स्वीकारा - सभापती अरुण तनपुरे यांचे कर्डिलेंना आवाहन



राहुरी ( प्रतिनिधी )


    दहा वर्षे तुम्ही राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार होता. तुम्ही दहा वर्षात केलेली विकास कामे आणि आम्ही पाचच वर्षात केलेली विकास कामे काय आहे हे सांगतो. प्राजक्त तनपुरे यांनी खुल्या चर्चेसाठी केलेले आव्हान स्वीकारा आणि स्टेजवरसमोरासमोर येऊन चर्चा करा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी केले आहे.

    राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेद्वार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ आज रविवारी सकाळपासून राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी मतदारांच्या भेटी घेत मतदारांशी संवाद साधला आहे. यावेळी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना तनपुरे म्हणाले की, विरोधक आमच्यावर सहकारी संस्था बंद पाडल्याची टीका करतात मात्र हा साखर कारखाना आमच्या काळात असताना जिल्हा बँकेने आम्हाला कर्ज न देऊन अडचणीत आणण्याचा प्रकार केला आहे. दुसरीकडे माञ विरोधकांच्या ताब्यात गेल्यावर जिल्हा बँकेने या कारखान्याला बेकायदेशीर कर्ज देऊन कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा करून हा कारखाना अडचणीत आणून बंद पाडला आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शक असून राज्यामध्ये या संस्थेचे नावलौकिक आहे. मात्र हे फक्त बिनबुडाचे आरोप आमच्यावर करत आहे. प्राजक्त तनपुरे यांनी पाच वर्ष मतदारसंघांमध्ये भरीव विकास कामे केले आहेत. त्यांच्याच विकास कामांवर जाऊन यांनी नारळ फोडण्याचे काम केले आहे .त्यामुळे या तालुक्यातील सुज्ञ मतदार सुसंस्कृत सुशिक्षित आणि विकासात्मक धोरण असलेल्या उमेद्वारालाच संधी देतील असा विश्वास तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केला

      यावेळी सुनिल मोरे, उपसभापती बाळासाहेब खुळे, भाऊसाहेब देशमुख, नाथा झुगे, केशव म्हसे, नानासाहेब म्हसे, कैलास झुगे, बाळासाहेब झगे, सजय झुगे, राजु काळे, वसंत ढेरे, बडु देशमुख, मच्छिंद्र भुसारे, आनंद वने, अरुण वने, बाळासाहेब आटोळे, भाऊसाहेब तनपुरे, बाबासाहेब शेळके, प्रभाकर बोबडे,बापु ढेरे आदिनाथ ढेरे, शादिक पठाण, विठ्ठल वाकडे, आशोक कांगुणे ज्ञानेश्वर बु-हाडे मच्छिंद्र बर्डे,रमेश वने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो

Post a Comment

0 Comments