Type Here to Get Search Results !

स्वतःला हिंदूंचे रक्षक समजणारा उमेदवार हिंदू धर्माचा रक्षक नव्हे तर भक्षक

 कर्डिलेंवरील दाखल गुन्हे प्रकरणात सर्वच लोक हिंदू धर्मातील असल्याने स्वतःला हिंदूंचे रक्षक समजणारा उमेदवार हिंदू धर्माचा रक्षक नव्हे तर भक्षक



प्राजक्त तनपुरे यांचा राहुरीतील सांगता सभेत भाजप उमेदवारावर घणाघात

राहुरी (विशेष प्रतिनिधी )




भाजपाच्या राहुरी मतदारसंघातील उमेदवारावर ( कर्डिले ) जेवढे गुन्हे दाखल आहेत . त्या प्रकरणातील सर्वच हिंदू धर्मातले असताना स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक समजणारा उमेदवार हिंदू धर्माचा रक्षक नव्हे भक्षक असल्याचा घणाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी येथील विजय निर्धार सभेत केला .



20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शहरात भव्य अशी प्रचार सांगता रॅली काढण्यात आली. नवी पेठेत झालेल्या या सभेला राहुरी शहरासह तालुक्यातून व नगर पाथर्डी भागातून मोठ्या संख्येने तनपुरे समर्थक आघाडीचे विविध पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी तनपुरे समर्थक उपस्थित होते.
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या केवळ 25 मिनिटांच्या भाषणात आपल्या पाच वर्षातील कार्याचा आलेख उपस्थितितांना वाचून दाखवत राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील जनता ही माझ्या कुटुंबातील सदस्य मानत असल्याचे म्हणत पाच वर्षांपूर्वी मी नवीन होतो . राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मला संधी दिली .
मी आमदार होऊन मंत्रीपदही दिले  .या मंत्रिपदाच्या काळात अनेक कामे करत वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याची ही जबाबदारी सांभाळली . मंत्रीपद असताना उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत पाहिली . ऊर्जा खात्याच्या माध्यमातून अनेक कामे  केली  . निळवंडे कालव्याचे काम केले . शेती , सबस्टेशन तसेच नगर पाथर्डी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची ही कामे केली  .
समोरच्या उमेदवाराने ( कर्डिले ) राहुरी शहरातील शनि मंदिरासमोर दंड थोपटण्यापेक्षा समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही प्राजक्त तनपुरे यांनी केले .
आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वाद घेऊन मी आलो असून धर्माचा मला देखील अभिमान आहे . मात्र आपण कोणालाही त्रास न देता कायम प्रेमच दिलेली आहे . म्हणून ही सध्याची निवडणूक धर्माची नव्हे तर पोटापाण्याची असल्याचे म्हणत प्राजक्त तनपुरे म्हणाले की , शेतीचे प्रश्न  ,शेतीमालाला भाव , निळवंडे , वांबोरी चारीचे पाणी , महावितरण , दुधाचे भाव , आदी प्रश्न सोडवण्यासाठी आपण व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व महाविकास आघाडी जनतेच्या जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून पवारांचा आमदार म्हणून मला या निवडणुकीत पुन्हा काम करण्याची संधी द्यावी , असे आवाहनही तनपुरे यांनी केली .
माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे यांनी केलेल्या भावनिक भाषणात माझा प्राजक्त कधी जनतेचा झाला हे कळलेच नाही , असे म्हणून प्राजक्त तनपुरे यांनी नगराध्यक्ष असताना शहरातील अनेक विकास काम केली .
आमदारकीच्या काळात राहुरी शहरातील तुळजाभवानी माता , राहुरी नगरपालिका तसेच राहू केतू, तिन्ही ठिकाणी भव्य कमान ( वेस )तयार केले . नवीन पाणी योजना , भुयारी गटार योजना , भव्य जॉगिंग ट्रॅक , बसस्थानक एवढेच नव्हे तर  व्यक्तिगत पातळीवर अनेक सरकारी योजना व वैद्यकीय कामे सर्वसामान्या ंसाठी केली .
सरकार विरोधात असतानाही विधानसभेत अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे प्रश्न मांडून प्राजक्त ने अनेकांची मने जिंकली . त्यामुळेच उत्कृष्ट भाषण पुरस्कार  मिळाला . एक आई म्हणून प्राजक्तचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगत प्राजक्तला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .

Post a Comment

0 Comments