संशयितरित्या फिरणारे चार घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार राहुरी पोलिसांनी केले जेरबंद
राहुरी - वृत्त विशेष
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत संशयितरित्या फिरणाऱ्या चार आरोपीकडे कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी घरफोडी चा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . राहुरी पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली .
या प्रकरणी ओम उमेश जनवेजा वय. 18 श्रीरामपूर , कौसर निसार शेख वय. 26 श्रीरामपूर , आदम युसुफ शहा वय.27 रा. वार्ड नं 2 श्रीरामपूर , तन्वीर सलीम खान वय. 21 श्रीरामपूर अशी या आरोपींची नावे असून त्यांना अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे , त्यानंतर पुन्हा दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमाड मा.हुजूर न्यायालयाने मंजूर केलेली आहे.
याबाबत राहुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
दि.9/11/2024 रोजी इसम नामे अफसर गफूर शेख, देवळाली प्रवरा ता.राहुरी यांनी त्यांचे दोस्ती मटन शॉप दुकान फोडून चोरी झाल्याबाबत राहुरी पोस्टे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1178/2024 भारतीय न्याय संहिता कलम 331 (6) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता . नमूद होण्याच्या तपासा दरम्यान दिनांक 9/11/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत संशयितरित्या फिरणाऱ्या चार आरोपीकडे कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे .
त्यांना अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे , त्यानंतर पुन्हा दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमाड मा.हुजूर न्यायालयाने मंजूर केलेली आहे.
सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे.नमूद गुन्हाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल यादव हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव , पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, सचिन ताजने, नदीम शेख, गोवर्धन कदम, अंकुश भोसले नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.
Post a Comment
0 Comments