Type Here to Get Search Results !

विकासाचे कोणतेही घेणे-देणे नसलेल्या उमेदवाराची शेवटची निवडणूक - खासदार निलेश लंके

 विकासाचे कोणतेही घेणे-देणे नसलेल्या उमेदवाराची शेवटची निवडणूक - खासदार निलेश लंके



राहुरी  ( प्रतिनिधी )

राहुरी, नगर,पाथर्डी मतदारसंघात या भागातील दडपशाही गुंडशाही संपविण्यासाठी सर्व समाज बांधवांत शांतता नांदण्यासाठी आ. प्राजक्त तनपुरेंना पुन्हा विधानसभेत पाठवून समोरील दडपशाही व विकासाचे कोणतेही घेणे-देणे नसलेल्या उमेदवाराची शेवटची निवडणूक करावी, असे आवाहन अहिल्यानगर दक्षिणचे खा. निलेश लंके यांनी केले.



जेऊर बायजाबाई येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय निर्धार सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, गोविंद मोकाटे, शरद झोडगे, बाबासाहेब गुंजाळ, संपतराव म्हस्के, रघुनाथ झिने, अभिजित ससाणे, मच्छिंद्र सोनवणे, अमोल जाधव, विजय डौले, प्रकाश देठे, उध्दवराव
दुसुंगे, विलास काळे, रामदास ससे आदि मान्यवर उपस्थित होते.
खा. लंके म्हणाले, येणारे सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार असून तुम्ही आमदार नाही तर, नामदार निवडणार आहात. या शासनाच्या माध्यमातून दुधाला ४० रुपये भाव, त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी, बेरोजगारांना दरमहा ४ हजार रुपये भत्ता, तसेच प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा या पंच सुत्रीवर काम करणार असल्याने प्राजक्त तनपुरेंच्या माध्यमातून आपलाच शिलेदार विधानसभेत पाठवावा, असेही आवाहन खा. लंके यांनी केले.बुऱ्हाणनगर योजनेत इतर गावे बसवून जलजीवनच्या माध्यमातून लवकरच काम पुर्णत्वास जाऊन या गावांची तहान भागविली जाईल. आमच्या सरकारने नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी या भागाचा विकासासाठी आस्तित्वात आणलेली नगरपालिका रद्द करून अडाणी पुतण्याच्या हट्टातून पुन्हा ग्रामपंचायत करण्याचा नवीन पायंडा पाडला. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुदृढ होण्यासाठी प्रयत्न केले, असे ते म्हणाले.
आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले, गेल्या पाच वर्षात कोणी मते दिली, कोणी नाही दिली, हे न पाहता सर्व मतदारसंघ आपले कुटुंब समजून सर्वांगिण विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. खोसपुरी, पांगरमल, मजले चिंचोली, या गावांना गेल्या दहा वर्षात वांबोरी चारीचे पुरेसे पाणी कधीही मिळाले नव्हते. परंतु, आपल्या ५ वर्षाच्या काळात पुरेसे त्याचबरोबर ओव्हर फ्लोच्या पाण्याचा लाभ या भागाला मिळवून देण्यात यशस्वी झालो. यासाठी फोटोसेशन मात्र केले नसल्याचा टोला त्यांनी कर्डिलेंना लगावला.
यावेळी उध्दवराव दुसुंगे, नाथा चव्हाण,शशिकांत गाडे, शरद झोडगे, रघुनाथ झिने, अॅड. अभिषेक भगत, संपतराव म्हस्के, भैयाजी पवार, गोविंद मोकाटे यांनी कर्डिलेंचा समाचार घेताना दहशतमुक्त नगर तालुका करण्याचे आवाहन केले.
यावेळी मनसेचे विजय काळे यांच्यासह १०० कार्यकर्त्यांनी खा. लंके व आ. तनपुरेंच्या हस्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला

Post a Comment

0 Comments