समाजमाध्यमात व्हिडिओ प्रसारित केल्या प्रकरणी त्या उमेदवाराला नोटीस
24 तासात खुलासा न दिल्यास फौजदारी कारवाईचा इशारा
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने समाजमाध्यमात व्हिडिओ प्रसारित केल्या याप्रकरणी 223 राहुरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी संबंधित उमेदवाराला नोटीस बजावत खुलासा मागितला असून फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे .
वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार आहात . आपण व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित केला आहे. व्हिडीओमध्ये आपण उमेदवार असल्याचा उल्लेख केला आहे. समाजमाध्यमांमध्ये उमेदवाराने कोणताही व्हिडिओ प्रसारित करण्यापूर्वी
जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची पूर्वमान्यता घेणे बंधनकारक आहे. तथापि अशी कोणतीही पूर्वमान्यता आपण घेतलेली नाही. व्हिडिओमध्ये आपण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे . तसेच दोन समाजांमध्ये वाद निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे .
व्हिडिओच्या माध्यमातून आपण घटनाबाह्य मार्गाचा वापर करून चिथावणीखोर वक्तव्य करून संविधानाच्या शपथेचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा २४ तासांच्या आत सादर करावा. अन्यथा आपणाविरुद्ध नियमोचित फौजदारी कारवाई करण्यात येईल , असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे .
Post a Comment
0 Comments