गुलाबी थंडीच्या वातावरणात होणार नक्कीच मतदान ; मतमोजणी होणार काय बोचऱ्या थंडीत !!
टीम - सतर्क खबरबात जिल्ह्याची
सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीतील प्रचारातच रंग चढलेला नसून नैसर्गिक वातावरणातही रंग चढलेला दिसून येत आहे .
गेल्या तीन दिवसातच किमान तापमानात तब्बल साडेसात अंशाने घट होत राहुरी परिसराचे व आजूबाजूच्या भागातील तापमान 12 अंशाखाली गेले आहे .
आणखी काही दिवस तापमानात अशीच घट राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे . त्यामुळे मतदानाच्या दिवशी उद्या गुलाबी थंडी राहणार असून मतमोजणीच्या दिवशी मात्र अशीच किंवा आणखी बोचरी थंडी राहणार काय असे मजेशीरपणे विचारले जात आहे .
यंदाच्या वर्षी राजकारणासारखेच नानाविध रंग निसर्गाच्या वातावरणात ही दिसून आलेली आहे . उन्हाळ्यात , पावसाळ्यात निसर्गाबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या वेळीही नानाविध प्रचाराची रंगत दिसून आली .
आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळातही हे चित्र दिसून येत असल्याचे हौशी निसर्गप्रेमी पर्यावरण प्रेमी मध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये चर्चिले जात आहे .
राहुरीच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाच्या ॲग्रोनॉमी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार 12 नोव्हेंबर 2024 रोजी कमाल 29.8° तर किमान 13.3 अंश तापमान होते . तेच 16 नोव्हेंबर 2024 ला रोजी कमाल 31.2 तर किमान 19.3 अंश तापमान होते . याच काळात राहुरीसह अन्य भागात ढगाळ वातावरण दिसत होते . त्यानंतर तीनच दिवसात मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी कमाल 30.8 तर किमान 11.9 इतके निचांकी तापमान नोंदले गेले . हे नोव्हेंबर महिन्यातील यंदाचे निचांकी तपमान आहे .
तीन दिवसातच अर्ध्या अंशाने कमाल तापमान तर तब्बल साडेसात अंशांनी किमान तापमानात घट झाली आहे . उद्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यभर मतदान होत आहे . सध्याचे वातावरण पाहता नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उद्या गुलाबी थंडीत मतदान प्रक्रिया होईल तर मतमोजणी बोचर्या थंडीत होणार काय असे विनोदाने चर्चिले जात आहे .
Post a Comment
0 Comments