Type Here to Get Search Results !

प्रचार नारळ फुटताच विविध भरारी पथके ॲक्शन मोडवर

प्रचार  नारळ  फुटताच  भरारी पथके  ॲक्शन  मोडवर



राहुरी मतदार संघात तीन ठिकाणी चेक नाके

सतर्क खबरबात जिल्ह्याची टीम : - 

निवडणूक प्रचारांचा नारळ फुटताच विविध भरारी पथके ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र राहुरी विधानसभा मतदारसंघात दिसत आहे . राहुरीत आज साडेतीन लाखाची रोकड जप्त केल्याने काहींमध्ये धास्ती तर  व्यवसाय उद्योग करणारे सतर्कता बाळगत असल्याचे चित्र आहे .




विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेने व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी व या काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी अवैध मद्य व पैशांची वाहतूक रोखण्यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघातील 3 तालुक्यांमध्ये विविध प्रकारची 16 पथके तैनात करण्यात आली आहेत . 




मतदारांना पैशाचे आमिष , अवैधरित्या रोख रक्कम व अवैध साहित्याची वाहतूक व अन्य बेकायदेशीर बाबींना आळा घालण्यासाठी विशेष पथकांमध्ये निवडणूक आयोग नियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पोलीस आणि चित्रीकरण करणारी व्हिडिओग्राफर असे हे पथक 




संपूर्ण मतदारसंघातील 28 सेक्टर मध्ये फिरती राहणार आहेत .
याशिवाय नागर देवळे ( नगर पाथर्डी रोड ) , मुळा डॅम फाटा ( नगर मनमाड रोड ) आणि मिरी - तिसगाव ( पांढरी पुल पाथर्डी रोड ) येथे तपासणी नाका ( एस एस टी पथक ) 24 तास तैनात राहणार आहे .



स्टॅटिक सर्विलन्स टीमची 6 पथके , फ्लाईंग स्क्वाड टीमची 6 पथके , व्हिडिओ सर्विलन्स टीमची 3 तर व्ही. व्ही .टी. चे तीन असे या संपूर्ण निवडणूक काळात कार्यरत राहणार आहे . 



       मागील लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक चार चाकी वाहनातील मोठ्या रकमा याच भरारी पथकाकडून जप्त करण्यात आल्या होत्या . त्यावेळी अनेकांना पुरावे सादर करायला नाकी नऊ आले होते .
विधानसभा निवडणुकीसाठी ही पथके तैनात केल्यानंतर राहुरी येथील साडेतीन लाखांची जप्त केलेल्या रोकड पहिलीच कारवाई असल्याने अवैधरीत्या मद्य व रोकड वाहतूक करणाऱ्यांमध्ये धास्ती तर शेती , व्यवसाय , व्यापार उद्योगात नियमित वाहतूक करणाऱ्यांमध्ये सतर्कता मात्र निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे .
223 राहुरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे  यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक निवडणूक अधिकारी  तथा राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील , भरारी पथक प्रमुख व निवडणूक अधिकारी सुधाकर मुंडे , निवडणूक कक्ष अधिकारी एस पी तायडे , राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच सेक्टर अधिकारी , पथकाचे कर्मचारी , पोलीस पथक , कार्यरत आहेत .

Post a Comment

0 Comments