Type Here to Get Search Results !

त्या चिलिंग प्लांटची २४ तासात विज व पाणी तोडा ! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे आदेश..!

 त्या चिलिंग प्लांट ची २४ तासात विज व पाणी तोडा. !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे आदेश..!

आप्पासाहेब ढूस यांच्या तक्रारीची दखल.!


                      ( संग्रहित )

नाशिक - दि.०४/११/२४

विशेष वृत्त -

आंतरराष्ट्रिय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांच्या तक्रारी नुसार अहिल्यानगर जिल्हयातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथील बेलापूर रोडवर असलेल्या गट नं. १६१३/१/अ मधील डी.एम.सी. दूध संकलन आणि शीतकरण केंद्र या चिलिंग प्लांट ची २४ तासात विज व पाणी तोडण्याचे आदेश नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे रिजनल ऑफिसर लिंबाजी भांड यांनी क्र . एमपीसीबी /आरओएनके/ सीडी/ 2876 /2024 दि. 25/10/2024 अन्वये महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी आणि देवळाली प्रवरा नगर परिषदेला दिले आहेत. 



        आप्पासाहेब ढूस यांच्या तक्रारी नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे नाशिक येथील अधिकारी यांनी दि. १५/१०/२०२४ रोजी समक्ष देवळाली प्रवरा येथे येवून या प्लांट ची पाहणी करून मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट सादर केला होता.



 तदनंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर देवळाली प्रवरा येथील या प्लांटला में सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा दाखला देवुन हा प्लांट तात्काळ बंद करण्याचे डी.एम.सी. दूध संकलन आणि शीतकरण केंद्र देवळाली प्रवरा यांना दिले आहेत व आदेश मिळाले पासून पुढील २४ तासात या प्लांट ची विज व पाणी तोडण्याचे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी आणि देवळाली प्रवरा नगर परिषदेला याच नोटिस मध्ये आदेश केले आहे. 

        या नोटिसीची प्रत अहील्यानगर येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे अधिकाऱ्यांना देनेत आली असून सात दिवसात या नोटिसिवर कारवाई झाली किंवा कसे हे पाहून अहवाल सादर करण्याचे निर्देश या नोटिसित देणेत आले आहे.

        या नोटिस मूळे जिल्हयातील दूध शीतकरण केंद्र धारकांच्या वर्तुळात खळबळ उडाली असून एम एस ई बी आणि नगरपरिषदे कडून पुढील २४ तासात होणाऱ्या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments