Type Here to Get Search Results !

जमावबंदी आणि ड्रायडे पहा... कधी आणि केव्हा !!

 जमावबंदी आणि ड्रायडे पहा... कधी आणि केव्हा !!



खबरबात जिल्ह्याची टीम - विशेष वृत्त

 बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर ला राहुरी विधानसभा मतदार संघातील निवडणुक मतदानासाठी कायदा व सुव्यवस्था व बाधित राहण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून 


मतदान प्रक्रियेसाठी  जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून 21 नोव्हेंबर रात्रीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून



 या पार्श्वभूमीवर राहुरीत आज पोलीस यंत्रणांकडून शहरात पोलीस संचलन करण्यात आले .



 आज राहुरी शहरात पोलीस प्रशासनाकडून विविध राज्यातील राखीव दलाचे जवान , सशस्त्र पोलीस , राज्यातील पोलीस कुमक , स्थानिक गृहरक्षक दलाचे जवान , महिला पोलीस यांनी संचलन केले. 

 बुधवार दिनांक 20 नोव्हेंबरला राहुरी विधानसभा मतदारसंघातील 307 मतदान केंद्रावर  संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने हे संचलन करण्यात आले .

 याशिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरी -नगर -पाथर्डी तालुक्यातील मतदान केंद्र व गावांमध्ये 163 कलमानुसार जमाव बंदी आदेश आज जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये लागू करण्यात आल्याचे आदेश आहेत . 

तीन दिवस जमावबंदी व  ड्राय डे : -

निवडणुका व सण उत्सव म्हटले की , खाण्या - पिण्याच्या शौकिनांनाही याचा फटका बसतो . राज्य उत्पादन शुल्क विभाग या काळात देशी व विदेशी मद्य विक्रेते आणि अनुज्ञप्ती धारक , परवानाधारक मद्य शौकीन  ग्राहकांसाठी सोमवार दिनांक 18 सायंकाळपासून ते गुरुवार दि. 21 नोव्हेंबर पर्यंत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments