Type Here to Get Search Results !

अमेरीकेतील जागतिक विमा परिषदेसाठी प्रशांत वाबळे यांची निवड

अमेरीकेतील जागतिक विमा

परिषदेसाठी  प्रशांत  वाबळे  यांची निवड



राहुरी  ( प्रतिनिधी )


टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचे अभिकर्ता व गुहा येथील रहिवासी प्रशांत चंद्रभान वाबळे यांना जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा मिलियन डॉलार राउंड टेबल हा सन्मान प्राप्त झाला आहे.



हा बहुमान प्राप्त झाल्यामुळे त्यांना २०२५ या वर्षात होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी मियामी बिच फ्लोरिडा या अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. 


प्रशांत वाबळे हे गेल्या १६ वर्षांपासून जीवन विमा, आरोग्य विमा, जनरल इशुरन्सचे विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा आणि जिद्दच्या माध्यमातुन त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विमा कंपनीकडून पुरस्कार मिळाले आहे.वाबळे यांनी आरोग्य विम्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना कोविड क्लेम प्राप्त करून देऊन आधार असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. जागतिक विमा परिषदेसाठी पात्र होण्यासाठी ओमकार असोसिएटचे विजय वाळके, कल्पना वाळके, प्रसाद वाळके, वृषाली शहाणे व रोहीत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Post a Comment

0 Comments