Type Here to Get Search Results !

निवडणूक प्रचार काळात 'याचे' उल्लंघन झाल्यास कडक कारवाई

निवडणूक प्रचार काळात 'याचे' उल्लंघन झाल्यास कडक कारवाई



सतर्क खबरबात जिल्ह्याची टीम



       निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारात नमुना मतपत्रिका छापण्यास निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत .




       आदेश २५ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे.



              विधानसभा निवडणूक प्रक्रिया कालावधीत शासकीय कार्यालये  आणि. विश्रामगृहांच्या  आवारामध्ये  मिरवणूक , सभा घेणे , मोर्चा काढणे , उपोषण करणे , घोषणा देणे ,

वाजविणे किंवा गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रचाराचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूला विंडो स्क्रीन ग्रासच्या पुढे राहणार नाही. 



            त्या वाहनाच्या टपापासून दोन फूट उंचीपेक्षा जास्त असणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे . 

वाहनावर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावावा असे निर्देश आहेत . अन्य कोणत्याही बाजूला लावता येणार नाही . त्यासाठी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कक्षात त्याची रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारात नमुना मतपत्रिका छापण्यास निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत. हे आदेश २५ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे.


ध्वनिक्षेपक वापरासंबंधी आयोगाचे कडक निर्देश असून 

कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी सहा वाजल्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही .


 प्रचाराकरिता ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, वाहन फिरत असताना ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास प्रतिबंध असणार आहेत.


सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधीच्या परनवानगीची माहिती कळविणे बंधनकारक आहे, अशी निवडणुकीच्या कालावधीत विविध वैषयिक ध्वनिक्षेपकासंबंधी आचारसंहिता असणार आहे.

Post a Comment

0 Comments