Type Here to Get Search Results !

अ...ब... बाबा... राहुरीत कर्डिलेंपेक्षा तनपुरेंचाच निवडणुकीसाठी झालाय दुप्पट खर्च

अ...ब... बाबा... राहुरीत कर्डिलेंपेक्षा तनपुरेंचाच निवडणुकीसाठी झालाय दुप्पट खर्च

 


राहुरी - सतर्क खबरबात जिल्ह्याची : विशेष वृत्त



राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी निवडणूक खर्च निरीक्षक अरुण चौधरी यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी करण्यात आली . यावेळी तेरा उमेदवार यांनी आपल्या प्रतिनिधींमार्फत वा स्वतः निवडणूक खर्चाचे विवरण सादर केले .



भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा 24 10 2024 ते 7 11 2024 पर्यंत एक लाख 86 हजार 688 इतका खर्च झाल्याचे निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे सादर केलेल्या विवरणात म्हटले आहे . तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा याच काळात 


   याच काळात तीन लाख 39 हजार 554 रुपये इतका खर्च झाल्याचे सादर केलेल्या विवरणपत्रात म्हटले आहे .

 अर्ज भरण्यापासून अनामत रक्कम , नोटरी , चहा , डिझेल , वाहन भाडे , मंडप , राहुरीतील सभा , प्रचार फेरी , चौक सभा , फराळ , फ्लेक्स , वाहन भाडे , असे विविध खर्चाचे विवरण उमेदवार शिवाजी कर्डिले , प्राजक्त तनपुरे तसेच अन्य 11 उमेदवारांनी आपापले निवडणूक खर्चाचे विवरण शनिवारी निवडणूक खर्च अधिकारी अरुण चौधरी यांच्याकडे सादर केले .

पुढील निवडणूक खर्चाचे तपासणी 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे

दरम्यान सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील अनेक भागात प्रचार काळात नक्कीच आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही का ? यासाठी निवडणूक आयोगाच्या विशेष पथकाने पाहणी करावी , अशी चर्चा नागरिकांमध्ये सध्या सुरू आहे .

 पुढील निवडणूक खर्चाचे तपासणी 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे

Post a Comment

0 Comments