दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने दीपावली निमित्त फराळ वाटप कार्यक्रम संपन्न
राहुरी ( प्रतिनिधी )
दीपावली व पाडव्यानिमित्ताने दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने 300 दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ वाटप महंत ह भ प संत कवी महिपती महाराज देवस्थान अर्जुन महाराज तनपुरे यांच्या शुभहस्ते व प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या खुशी दीदी यांच्या अध्यक्षतेखाली
सामाजिक सामाजिक कार्यकर्ते बबलू खोसला जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव शिंदे सर महिला तालुकाध्यक्ष छायाताई हारदे तालुकाध्यक्ष योगेश लबडे तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी सुभाष कोकाटे सर अशोकराव तुपे दवणगाव येथील गोरक्षनाथ जराड काका यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.तसेच या कार्यक्रमासाठी माजी खासदार प्रसाद राव तनपुरे साहेब यांनी धावती भेट दिली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी सांगितले दिव्यांग संघटनेची स्थापना 2021 मध्ये झाली संस्थेच्या माध्यमातून चला घर बांधूया, दिव्याची चला चुल पेटवू या दिव्याची, माणुसकीची भिंत,चला व्यावसायिक बनवू, रक्तदान शिबिर, दंत तपासणी शिबिर दिव्यांग दिनदर्शिका उपक्रम,प्रत्येक वर्षी फराळ वाटप कार्यक्रम, शासनाची योजना प्रत्येक दिव्यांगापर्यंत जाणे गरजेचे आहे या दृष्टीने मोफत काम करत असते. फराळ वाटप हे फक्त निमित्त आहे यानिमित्ताने राहुरी तालुक्यातील दिव्यांग बांधव एकत्र येतात विचाराचे देवाण-घेवाण होते नवीन योजनेची माहिती मिळावा यासाठी शिबिराचे आयोजित केले जाते. ह. भ. प.अर्जुन महाराज तनपुरे म्हणाले संस्थेचे काम दिव्यांगासाठी चालू असतं मी जवळून पाहतो मधुकर घाडगे असतील त्याचबरोबर त्यांचे पदाधिकारी असतील दिव्यांगाचे लाभ मिळण्यासाठी कायम त्यांची धडपड चालू असते आपलं गेलं काय त्यापेक्षा आपल्या आपल्याकडे शिल्लक काय आहे याचा चांगला वापर करून दिव्यांगासाठी चालू आहे. असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.खुशी दीदी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की दिव्यांग शक्ति सेवा सामाजिक संघटना राहुरी तालुक्यात दिव्यांगासाठी तसेच विविध उपक्रम राबवण्यासाठी अग्रेसर असते काम करत आहेत . यावेळी कृपा वृद्धाश्रम तांदुळवाडी या ठिकाणीही फराळ वाटप करण्यात आले.आसरू सिनारे साहेब यांच्या वतीने 30 किलो बुंदीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी , तालुका समन्वयक भास्करराव दरंदले, राजेंद्र आघाव,तालुका कार्याध्यक्ष सुरेश दानवे, दवणगावचे शाखाध्यक्ष नानासाहेब खपके, चेडगाव शाखा अध्यक्ष सतीश तरवडे,ह.भ.प आदिनाथ दवणे,महिला शहराध्यक्ष अनामिका हरेल, अनुराधा घोडेकरमॅडम, दत्तात्रय खेमनर, प्रदीप कड, बाबासाहेब मुसळे, विष्णू ठोसर, भारत आढाव,कैलास हारदे, बाळासाहेब गांडाळ,वेनुनाथ आहेर, शिवाजी जाधव, चे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार रवींद्र भुजाडी यांनी मानले.
.
Post a Comment
0 Comments