Type Here to Get Search Results !

राहुरी शहरात महायुतीच्या वतीने प्रचार फेरी

राहुरी शहरात महायुतीच्या वतीने प्रचार फेरी



राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी शहरात महायुतीच्या वतीने नुकतीच प्रचार फेरी काढण्यात आली. राहुरी शहरात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उद्याच्या निकालानंतर आमदार होताच मी शासनाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू करेल.

असा आरोप करत महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले म्हणाले की , मागासवर्गीयांना हक्काचे घरकुल मिळवून देईल. आमच्यावर दहशतीचे आरोप केले जात आहे. हे करताना हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींना, जय श्रीराम म्हणणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. राहुरी कोणाच्या दहशतीखाली आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे राहुरी खऱ्या अर्थाने दहशतमुक्त होण्याचे काम माझ्या विजयाने २३ तारखेला होणार आहे, असा विश्वास राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केला.

     माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राहुरी शहरात प्रचार फेरी काढून शक्तिप्रदर्शन केले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राहुरी शहरासह मतदार संघातील महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक आदी उपस्थित होते.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले, शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, आदी प्रश्न प्रलंबित आहे. मी मंजूर केलेले कामे देखील यांनी होऊन दिली नाही. शहरात घरकुल योजना राबवू. आपला विजय अटळ आहे. 

राहुरी तालुक्यातील प्रचारात युवा नेते अक्षय कर्डिले यांनी विकासाच्या दृष्टीने दंड थोपटले तर त्यांना पोटशूळ उठला खरे तर आम्ही पैलवान मंडळी आहोत. कोणतंही मैदान असलं तरी दंड थोपटू शकतो. आता त्यांना दंडही थोपटता येत नाही आणि जोर बैठकाही मारता येत नाही यात आमचा काय दोष असा टोला कर्डीले यांनी तनपुरे यांना नाव न घेता लगावला.

Post a Comment

0 Comments