नगर जिल्ह्यात एक वाजेपर्यंत सरासरी 32 टक्के मतदान : राहुरी मतदारसंघात वाढतोय मतदानाचा टक्का !
दुपारी एक वाजेपर्यंत 31 टक्के मतदान
राहुरी - सतर्क खबरबात टीम
राहुरी विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत एक लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . मात्र यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांच्या मतदान पाच टक्क्याने कमी असल्याचे दिसत आहे .
राहुरी राहुरी शहरातील ल. रा बिहाणी विद्यामंदिर प्रशाला , प्रगती विद्यालय व सौ भागीरथीबाई तनपुरे विद्यालयात शांततेने मतदान सुरू होते . अकरा वाजेपर्यंत 16 % मतदान झाल्याचे निवडणूक कक्षाकडून सांगण्यात आले .
दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या परिवारासह शहरातील प्रगती विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले .
सकाळी नऊ वाजेपर्यंत दोन तासात केवळ पाच टक्के मतदान झाले . त्यानंतरच्या दोन तासांमध्ये मतदानाची आकडेवारी वाढल्याचे दिसून आले अकरा वाजेपर्यंत 16 टक्के मतदान झाले .
31 हजार 612 पुरुष मतदार तर 19 हजार 993 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . अकरा वाजेपर्यंत एकूण 51 हजार 605 मतदारांनी मतदान केले , तुलनेने पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण सहा टक्क्यांनी कमी दिसून आले .
दुपारी एक वाजेपर्यंत 56 हजार 190 पुरुष मतदार तर 43 हजार 995 महिला मतदारांनी मतदान केले एक वाजेपर्यंत एकूण एक लाख 185 मतदारांनी मतदान केले
राहुरी शहरासह मतदारसंघातील अनेक भागांमध्ये आर्थिक घडामोडी सुरू असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या . मात्र अनेकांनी याबाबत कानावर हात ठेवले . राहुरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नामदेव पाटील , पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , राहुरी नगर पाथर्डी, मतदार संघातील 308 मतदान केंद्रांवरील सेक्टर ऑफिसर तसेच पोलिसांच्या विशेष दलाच्या तुकड्या मतदान प्रक्रिया शांततेने पार पाडत असल्याचे चित्र दिसून येत आहे .
राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी 360 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून शांततेने मतदान सुरू झाले .
राहुरी राहुरी शहरातील ल. रा बिहाणी विद्यामंदिर प्रशाला , प्रगती विद्यालय व सौ भागीरथीबाई तनपुरे विद्यालयात शांततेने मतदान सुरू होते . अकरा वाजेपर्यंत 16 % मतदान झाल्याचे निवडणूक कक्षाकडून सांगण्यात आले .
सकाळी नऊ वाजेपर्यंत दोन तासात केवळ पाच टक्के मतदान झाले त्यानंतरच्या दोन तासांमध्ये मतदानाची आकडेवारी वाढल्याचे दिसून आले अकरा वाजेपर्यंत 16 टक्के मतदान झाले .
31 हजार 612 पुरुष मतदार तर 19 हजार 993 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . अकरा वाजेपर्यंत एकूण 51 हजार 605 मतदारांनी मतदान केले , तुलनेने पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण सहा टक्क्यांनी कमी दिसून आले .
राहुरी शहरासह मतदारसंघातील अनेक भागांमध्ये आर्थिक घडामोडी सुरू असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या . मात्र अनेकांनी याबाबत कानावर हात ठेवले . राहुरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नामदेव पाटील , पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , राहुरी नगर पाथर्डी, मतदार संघातील 308 मतदान केंद्रांवरील सेक्टर ऑफिसर तसेच पोलिसांच्या विशेष दलाच्या तुकड्या मतदान प्रक्रिया शांततेने पार पाडत असल्याचे चित्र दिसून येत आहे .
Post a Comment
0 Comments