Type Here to Get Search Results !

टाळ , पावा , मंजिरीच्या निनादात पहा तुतारीचा प्रचार

टाळ , पावा , मंजिरीच्या निनादात पहा तुतारीचा प्रचार



राहुरीत प्राजक्त तनपुरे यांच्या तुतारीच्या प्रचारासाठी

लोककलेद्वारे जागृती करणारे वासुदेवही उतरले मैदानात



राहुरी  ( प्रतिनिधी )

              सध्या  झारखंड  व  महाराष्ट्रातील   विधानसभा निवडणुकीत चांगलाच रंग भरायला सुरुवात झाली आहे . झारखंडमध्ये  अनेक  ठिकाणी  मतदारांपर्यंत  जाण्यासाठी पारंपारिक  कला  व  संस्कृती 






याचे   वैशिष्ट्य  असणारे  कलाप्रकार   सादर   करून   मतदारांमध्ये उमेदवारांविषयी  प्रचार  केला  जात आहे .
यातच  महाराष्ट्रातील  निवडणूक  प्रचार  काळातही असे  दृश्य दिसून येत आहे . ते  ही नगर जिल्ह्य़ात राहुरीत !!



नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारासाठी



 भल्या सकाळी लोक जागृती आपल्या पारंपारिक कलांनी सादर करणारे वासुदेव उतरल्याचे चित्र राहुरी शहरासह परिसरात दिसून येत आहे .
प्राजक्त तनपुरे यांनी आपला निवडणूक प्रचारात अनेक हातखण्डे वापरत ग्रामीण भागातील वासुदेव हे कला जपणाऱ्या वासुदेवांच्या पथकाला पाचारण केले असून या चार ते पाच जणांच्या वासुदेवांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी जात प्राजक्त तनपुरे यांच्या कामाविषयी आपल्या कलेतून सादरीकरण करत असल्याचे चित्र आहे .
अनेक ठिकाणी नागरिक , ग्रामस्थ , विशेषतः महिलांनी याचे स्वागत  केले आहे . सध्या या वासुदेवांचं कला सादर करणार प्रचारातील पथक मतदारांची ही देखील आकर्षण बनल्याचे चित्र दिसून येत आहे . सध्याच्या निवडणूक प्रचार काळात अशी नानाविध प्रकारचे परंपरा व संस्कृती आणि कलेला विषयक प्रचारात  उतरले असल्याने सध्या या वासुदेव पथकाची चर्चा सर्वत्र सुरू आहे . महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी हा अनोखा मार्ग स्वीकारल्याने त्यांच्याही नावाने नावाची चर्चा सर्वत्र होत आहे .

वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरीनाम बोला ||




डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे हे रुप पाहिलं की मुखी हरीनामाचा जप करणारा वासुदेव आपल्या नजरेस पडतो. गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा हा लोककलाकार अर्थात वासुदेव .



Post a Comment

0 Comments