Type Here to Get Search Results !

राहुरी शहरात उद्या तनपुरे - कर्डिले यांच्या भव्य प्रचार सांगता सभा

 राहुरी शहरात उद्या तनपुरे - कर्डिले यांच्या भव्य प्रचार सांगता सभा



टीम खबरबात - विशेष वृत्त

राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून उद्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुरी शहरात प्राजक्त तनपुरे , शिवाजी कर्डिले यांच्या दुपारी प्रचाराच्या सांगता सभा होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .



दरम्यान निवडणूक प्रक्रिया शांततेने व अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने आज राहुरीत रूट मार्च काढला असून उद्या राहुरी शहरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे .




विधानसभा निवडणूक साठी उद्या सोमवार दिनांक 18 सायंकाळी सहा वाजता प्रचाराची वेळ संपणार आहे .
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ प्रचार सांगता सभा व भव्य रॅली



    उद्या सोमवार दि.१८/११/२०२४  रोजी दुपारी १२.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सुरुवात होणार आहे. रॅलीचे रुपांतर नवी पेठ राहुरी जुना सरकारी दवाखाना समोर सभेत होणार आहे.
  या रॅली व  सभेकरीता हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने व प्राजक्त तनपुरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
तर राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदार संघातील भा. ज. पा. व महायुतीचे अधिकृत उमेदवार  शिवाजी कर्डिले  यांच्या प्रचारार्थ  भव्य विजय निर्धार सांगता सभा  दि. 18/11/2024 रोजी दुपारी 01:00 वा. आयोजित केलेली आहे , ही सभा   राहुरी शहरातील नाका नंबर 05, अंबिका माता मंदिरा जवळ, स्टेशन रोड येथे होणार असून या सभेला हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांसह उपस्थित राहावे , असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

आज राहुरी शहरात पुन्हा पोलीस प्रशासनाकडून विविध राज्यातील राखीव दलाचे जवान , सशस्त्र पोलीस , राज्यातील पोलीस कुमक , स्थानिक गृहरक्षक दलाचे जवान , महिला पोलीस यांनी संचलन केले. 

 बुधवार दिनांक 20 नोव्हेंबरला राहुरी विधानसभा मतदारसंघातील 307 मतदान केंद्रावर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने हे संचलन करण्यात आले . याशिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरी -नगर -पाथर्डी तालुक्यातील मतदान केंद्र व गावांमध्ये 163 कलमानुसार जमाव बंदी आदेश आज जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये लागू करण्यात आल्याचे आदेश आहेत . 

निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस उपअधीक्षक , पोलीस निरीक्षक , सी आर पी एफ तसेच महिला पोलीस व गृह रक्षक दलाचे जवान यांचा चोख पोलीस बंदोबस्त राहुरी विधानसभा मतदारसंघात राहणार आहे . 

Post a Comment

0 Comments