Type Here to Get Search Results !

माझा प्राजक्त तुमचा कधी झाला कळलेच नाही - उषाताई तनपुरे

राहुरी विधानसभा मतदार संघात होणाऱ्या तनपुरे - कर्डिले यांच्या तुल्यबळ लढतीत आ. प्राजक्त तनपुरे होणार किंगमेकर होणार का


राहुरी ( प्रतिनिधी )

महाविकास आघाडीच्या राहुरीतील सांगता सभेत प्राजक्त तनपुरे यांच्या आई माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी केलेले भावनिक आवाहन सध्या चांगलेच चर्चेत आलेले आहे .



माझा मुलगा प्राजक्त तुमचा कधी झाला हे कळलेच नाही  , भावनिक वक्तव्य सांगता सभेत उषाताई तनपुरे यांनी आज सोमवारी केले . 


या सभेला महिलांची उपस्थितीही लक्षणे होती . राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरेंना चांगला प्रतिसाद पाहता आमदार तनपुरे यांच्या सभेला मोठी उपस्थिती राहील , अशी शक्यता व्यक्त केली जात होती.


राहुरी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार उभे असून यामध्ये तनपुरे व कर्डिले यांच्यातच तुल्यबळ लढत होणार असून २०१९ ला महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली .



त्यावेळी राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवित असताना राहुरीकरांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांना थेट आमदार म्हणून निवडून आले .



       आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात शिवाजी कर्डिले उभे राहिले . तनपुरे - कर्डिले यांच्यात तुल्यबळ लढत होऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा पराभव करून विजयश्री खेचून आणली . त्यानंतर सरकारमध्ये त्यामध्ये आघाडी सरकारची स्थापना होत तनपुरे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली .
      आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात प्राजक्त तनपुरे यांनी अडीच वर्षे मंत्रिपदाचा कारभार सांभाळला . या कालावधीत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ऊर्जा खात्याच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली.
          दरम्यान आपणच विजयी होणार असे दावे प्रति दावे सत्ताधारी विरोधकांकडून केले जात असले तरी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे  होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आ. प्राजक्त तनपुरे यांना विजयी करण्याचा संकल्प सोमवारी तालुक्यासह मतदारसंघातून आलेल्या समर्थकांनी व्यक्त केला .

Post a Comment

0 Comments