पक्षनिष्ठांचे उपरणे खुंटीला टांगून अनेकांनी पत्करला व्यक्तीनिष्ठेचा पर्याय ; लोकसभेतील पक्षांचे पट्टे उतरवत विरोधकांचे पट्टे घालण्याची अनेकांवर आली वेळ
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
राहुरी तालुक्याला निवडणुका नवीन जरी नसल्या तरी साऱ्या निवडणुका या स्थानिक व वरिष्ठ नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते , समर्थक , आघाड्या व मंडळ एवढेच नव्हे तर अधिकारी वर्ग व स्थानिक मतदार याला उकळून केलेले असल्याचे नेहमी विनोदाने म्हटले जाते .
याच राहुरी तालुक्याने तापर्यंत विधानसभेसाठी सोळा वेळा सात नेते लोकप्रतिनिधी आमदार म्हणून दिलेले आहेत .
याच काळात केंद्राच्या परिसिमन आयोगाच्या शिफारशीनुसार राहुरी तालुक्याचे विभाजन झाले .
राहुरी तालुका हा मतदारसंघाच्या रूपाने राहुरी आणि श्रीरामपूर मध्ये विभागाला गेला . तेव्हापासून दोन दशकांपासून येथे म्हणजेच राहुरी तालुक्यात दोन मतदारसंघ , दोन नगरपालिका , दोन साखर कारखाने , दोन खासदार , दोन आमदार असे चित्र पहावयास मिळाले .
त्यात भर पडली ती दोन्ही बाजूनेही दुहेरी निष्ठा असणाऱ्या नेते , समर्थक , कार्यकर्ता यांची .
हा प्रकार पुढील काळात होतच राहिला . परिणामी अनेक भागात रस्ते , नागरी सुविधा , पाणी , शासकीय कामे , शेती विषयक सर्व समस्या व त्यांचे निराकरण , कांदा , ऊस , कापूस , सोयाबीन , चारा पिके यांचे प्रश्न , गावोगावच्या अन्य विकास योजना , जिल्हा परिषदेसह राज्य व केंद्राच्या विविध योजनांसाठीचा स्थानिक आमदार खासदारांना मिळणारा निधी , त्यातील त्या संबंधित लोकप्रतिनिधी नेते , लोकप्रतिनिधींची मानसिकता , त्यांचे समर्थक , त्यांचे प्राधान्यक्रम या सर्वांचा मोठा फटका राहुरी तालुक्यातील दोन मतदारसंघातील गावांना बसलेला आहे हे मान्य करावेच लागेल .
अलीकडच्या काळात स्थानिक आघाडी , मंडळांचे निष्ठावंत कार्यकर्त्यांची परंपरा खंडित होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले . गेल्या दोन दशकानंतरच्या सध्याच्या निवडणुकीत हे चित्र अगदी सूर्यप्रकाशाएतके स्पष्ट दिसत आहे .
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जे अनेक स्थानिक नेते , कार्यकर्ते , समर्थकांनी विविध पक्ष संघटनांच्या पक्षांचे झेंडे , पताका , उपरणे , विचार अंगा खांद्यावर घेऊन निवडणूक प्रचारात दिसत होते . त्यातीलच अनेक नेते कार्यकर्त्यांनी ते उतरवत या विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या विरोधात पूर्वी ( लोकसभेत) प्रचार केला , त्यांच्या पक्षांचे झेंडे , उपरणे आपल्या खांद्यावर घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे .
त्यामुळे असे पाहताना जुन्या पक्षनिष्ठा जपणारे कार्यकर्ते , समर्थकांना असे दृश्य पाहण्याची वेळ आली आहे . अशी चर्चा राहुरी सह अन्य सर्व ठिकाणी दिसून येत आहे . असे पाहताना निष्ठावंत कार्यकर्ते अनुत्तरीत असल्याचे चित्र आहे .
Post a Comment
0 Comments