Type Here to Get Search Results !

धनगर समाजासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे मोठे योगदान

 धनगर समाजासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे मोठे योगदान : तनपुरे यांच्या विजयासाठी धनगर समाज कटिबद्ध - यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांची पत्रकार परिषदेत ग्वाही



राहुरी ( प्रतिनिधी )

धनगर समाजाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी या संस्थेस राहुरी नगरपालिकेकडून 10 गुंठे जागा इमारत व विस्तारित बगीचा अहिल्याभवन साठी उपलब्ध करून दिले व अहिल्याभवन येथे पुस्तकासहित,अभ्यासिका व विद्यार्थी मार्गदर्शन केंद्रासाठी आमदार प्राजक्त तनपुरे कायम सहकार्य व योगदान देत आलेले आहेत . उद्याच्या निवडणुकीत तनपुरे यांना निवडून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे धनगर समाज कार्यकर्ते व पंढरपूर येथील धनगर समाज उपोषणकर्ते , यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले . 

यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की , 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मला वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवारी होती . परंतु सर्व समाज बांधवांनी आग्रह धरला की आपण निवडून येणार नाहीत तर आपल्या तालुक्याची हानी कशाला करता म्हणून प्राजक्त दादा तनपुरे यांना पाठिंबा देऊन निवडून आणता येईल असे सर्वनुमते ठरले . यासाठी अर्ज मागे घेऊन आम्ही पाठिंबा दिला आणि 2019 च्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे विजयी झाले त्याची जाणीव म्हणून व आमच्या समाजाशी त्यांची नेहमीच असलेली कौटुंबिक बांधिलकी या नात्याने त्यांनी धनगर समाजासाठी भरीव असे योगदान दिले.


याशिवाय मुळा धरणातून वावरथ जांभळी,जांभुळबन या गावांना जोडण्यासाठी 110 कोटी रुपयांचा पूल मंजूर करण्यासाठी जलसंपदा खाते व सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे पाठपुरावा करून पुलाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून 19 लाख रुपये मंजूर करून ते पूर्ण केले व पुढील काम अंतिम टप्प्यात आणण्यात आमदार प्राजक्त तनपुरे यांचेच मोठे योगदान असल्याचे तमनर यांनी सांगितले .

यावेळी तमनर म्हणाले की , वावरथ-जांभळी, जांभूळबन या गावासाठी स्वतंत्र 5.5 कोटी रुपयांचे सबस्टेशनचे काम पूर्ण केले .वावरथ जांभळी या गावांसाठी एक कोटी रुपयांची यांत्रिक बोट मंजूर केली की ज्यामधून चार चाकी वाहनाने बोटीतून प्रवास करता येणार आहे बोटीचे काम पूर्ण झाले असून थोड्याच दिवसात बोट कार्यान्वित होणार आहे. तसेच चिखलठाण,मांजरी,वांजुळपोई या धनगर बहुल गावांसाठी स्वातंत्र्य सबस्टेशन कार्यान्वित केले आहे. तनपुरे यांनी निधीतून वावरथ येथील खिल्लार वाडा येथे सभामंडप दिला , वरवंडी येथे शिंगाडे वस्ती येथे सभामंडप दिला . घोरपडवाडी येथे 12.5 लाख रुपयांचा बिरोबा मंदिर येथे सभा मंडप दिला. शेरी चिखलठाण येथील सभामंडप दिला. धनगर समाजातील सर्व वाड्या वस्त्यांचा तांडा वस्ती मध्ये समावेश केला. धनगर समाज मेंढपाळ बांधवावरील अन्यायाच्या विरोधात प्राजक दादा तनपुरे कायम समाजासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले .

दरडगाव थडी येथील भाऊसाहेब भिवा गलांडे या समाज बांधवाचे भर पावसाळ्यात वनविभागाने शेती व घर उध्वस्त केले यावेळी आपले मंत्रिपद असताना शासनाच्या विरोधात जाऊन समाज बांधवांच्या पाठीशी उभे राहिले. 

वनविभागाचा अधिकारी देवखिळे यांच्यावर हक्कभंग आणला.

घोरपडवाडी येथील रामा बाचकर यांच्या शेतीवर असणाऱ्या अतिक्रमणाबाबत दोन्ही समाजात बैठक घेऊन धनगर समाज बांधवास न्याय मिळवून दिला.

घोरपडवाडी येथील मेंढपाळ भगिनीवर अत्याचार करणाऱ्या मुजोर वनविभागाच्या अधिकाऱ्याचे निलंबन करून गुन्हा दाखल केला. धनगर समाजाच्या घरकुलासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून 17 घरकुल आपल्या राहुरी मतदार संघात मंजूर केले. याशिवाय आमदार प्राजक्त तनपुरे यांनी वन विभागाच्या लगत असणाऱ्या अधिकाऱ्यांशी समन्वय करून पाईपलाईन,रस्ते,पाणी यासाठी अनेकदा बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावले. धनगर समाजासाठी मोठ्या प्रमाणात तनपुरे यांनी सहयोग दिलेले असल्याने उद्याच्या 20 तारखेच्या निवडणुकीत तनपुरे यांनाच धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत विजय तमनर यांनी केले .

Post a Comment

0 Comments