महाराष्ट्र पोतराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा तनपुरे यांना पाठिंबा
राहुरी ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र पोतराज सेनेचे राहुरी तालुक्याच्या सर्व पदाधिकारी यांनी आज राहुरीत येऊन महाविकास आघाडीच्या चे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांना
यांची भेट घेऊन त्यांना आपल्या पाठिंबा जाहीर केला .
यावेळी महाराष्ट्र पोतराज सेनेचे राहुरी तालुक्यातील व मतदार संघातील पदाधिकारी व पोतराज स्थानिक पोतराज मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की , पोतराज सेना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा नेहमीच संपर्क आणि सहकार्य राहिलेले आहे . त्यांच्या कामातील समस्या देखील जाणून असून पोतराज सेनेने दिलेला पाठिंबा नक्कीच महाविकास आघाडी व आपल्याला विजयासाठी साथ देईल .
त्यांच्या येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून असणाऱ्या मागण्या व कामे मार्गी लावली जातील पोतराज संघटनेच्या अनेक सदस्यांचे नगर पाथर्डी तालुक्यात देखील नेहमीच सहकार्य लाभलेले आहे असेही तनपुरे म्हणाले .
पोतराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास कणगरे यावेळी म्हणाले की , सन २०२४ रोजी होऊ घातलेल्या विधानसभा सर्वात्रिक निवडणूक महाराष्ट्र राज्य. आपण राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढवत आहात . आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा आज रोजी देत आहोत. तरी आपण येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून असणार्या मागण्या व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार , अशी आम्हाला खात्री आहे .
जाहीर पाठींबा देण्यासाठी रामदास कणगरे - संस्थापक अध्यक्ष , ज्ञानेश्वर जगधने - कार्य अध्यक्ष , देविदास वैरागर - राज्य उपाध्यक्ष , लखन ससाणे - राज्य सरचिटणीस , पोपट भिकाजी दिवे - ज्येष्ठ कार्यकर्ते , सुरेश जगधने - तालुकाध्यक्ष , पप्पू वैरागर - युवक तालुकाध्यक्ष सह मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments