लाडक्या बहिणींसाठी पाहिले लाडक्या भावांचे काय ? पहा कुणी विचारला जाब
ग्रामसडक योजना टप्पा -2 राबवली असती तर 50 किलोमीटर पर्यंतचे रस्ते झाले असते प्राजक्त तनपुरे
राहुरी ( प्रतिनिधी )
महायुती सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा दोन योजना दोन वर्षात राबवली असती तर राहुरी तालुक्यातील 50 किलोमीटरचे रस्ते झाले असते .
ही योजना बासनात बांधून शासनाचा पैसा अन्यत्र खर्च केल्याचा आरोप महा विकास आघाडीचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्राजक आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आरडगाव येथील प्रचार सभेत केला .
प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले की , 2016 मध्ये राहुरीचा नगराध्यक्ष असताना पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना मोठ्या गाजावाजा सुरू झाली . 2022 पर्यंत सर्व गावांना घरकुल योजनेचे घरे असतील असेही जाहिरातबाजी करण्यात आली . राहुरी नगरपालिका हद्दीत 4 हजार नागरिकांनी घरकुलासाठी अर्ज केले , मात्र त्यातील फक्त 300 ते 400 घर मंजूर झाले . त्यातीलही अनेकांचे हप्त्याचे पैसे अद्याप येणे बाकी असल्याचा आरोपही तनपुरे यांनी केला.
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता तनपुरे म्हणाले की , समोरचे विरोधक आम्हाला पाच वर्षांचा हिशोब विचारत आहेत . पाच वर्षात आपण गावोगावी महावितरणची निगडित कामे केली . रस्ते , मूलभूत सुविधा , पिण्याचे पाणी आदी कामे केले . याउलट समोरच्या विरोधकांनी दहा वर्षात एक तरी विकासाचे काम केल्याचे सांगावे , असा टोलाही तनपुरे यांनी लगावला .
महायुती सरकारने लाडक्या बहिणी साठी योजना करताना महाराष्ट्र युवा प्रशिक्षण योजनेतील लाडक्या भावांच्या तोंडाला पाणी पुसल्याचाही आरोप करत तनपुरे म्हणाले की , गेल्या तीन महिन्यांपासून या युवा रोजगार प्रशिक्षण घेणार्या भावांचे पगार झाले नसून बिन पगारी कष्ट करून घेण्याचे काम सरकार करत आहे .
आता महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला . यावेळी मोठ्या संख्येने आरडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ तनपुरे समर्थक महाविकास आघाडीचे मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments