Type Here to Get Search Results !

राहुरी कॉलेज येथे उद्या होणाऱ्या मतमोजणीची पहा प्रक्रिया : सीआरपीएफ , एस आर पी एफ , विशेष दलाचे जवान तैनात राहणार

 राहुरी कॉलेज येथे उद्या होणाऱ्या मतमोजणीची पहा प्रक्रिया :

सीआरपीएफ , एस आर पी एफ , विशेष दलाचे जवान तैनात राहणार



सतर्क खबरबात जिल्ह्याची - टीम

 223 राहुरी मतमोजणी तयारी पूर्ण झाली असून उद्या सकाळी आठ वाजता रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय राहुरी कॉलेज येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे . ईव्हीएम मतमोजणीच्या एकूण 14 फेऱ्या होणार आहेत .




दीड वाजेपर्यंत निवडणुकीचा कल समोर येऊ शकतो अशी शक्यता आहे . 

निवडणूक मीडिया कक्षा कडून मिळालेल्या माहितीनुसार , EVM करिता 1 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी - तहसीलदार असून मतमोजणीसाठी 14 टेबल्स असतील. 


प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 सहाय्यक, 1 सूक्ष्म निरीक्षक, 1 शिपाई व अतिरिक्त दोन कर्मचारी असतील. 

टपाली करिता 6 टेबल्स असतील , प्रत्येक टेबल करिता 1 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 पर्यवेक्षक, 2 सहाय्यक, 1 सूक्ष्म निरीक्षक सहभागी असतील. e PB करिता (सेवा मतदारांच्या मतांची मतमोजणी) स्कँनिंग: 1 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी - नगरपालिका CO , 6 टेबल्स: 1 पर्यवेक्षक असेल.  त्याव्यतिरिक्त स्ट्रॉंग रुम करिता स्वतंत्र मनुष्यबळ - नायब तहसीलदार व पथक तैनात राहणार आहेत. 


3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था

सर्वांत आत: CRPF जवान

मध्ये: SRPF जवान

बाहेर: राज्य पोलीस तैनात राहणार आहेत

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विशेष सूचना देण्यात आली असून मतमोजणी कक्षामध्ये ओळखपत्राशिवाय कोणासही प्रवेश दिला जाणार नाही . याशिवाय मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोन , इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास सक्त मनाई असेल.  मतमोजणी केंद्रामध्ये कोणासही पेन आणण्यास मनाई (मतमोजणी प्रतिनिधींना पेन पुरवले जातील)


EVM मतमोजणीच्या एकूण फेऱ्या : 14 असतील. 

लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, राहुरी येथे सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू करण्यात येईल. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी सुरू होईल. उद्याच्या मतमोजणीसाठी राहुरीसह मतदार संघातून मोठ्या संख्येने उमेदवारांचे समर्थक कॉलेज परिसरात गर्दी करतील . अशा हिशोबाने मोठा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . उद्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागली आहे आहे .

Post a Comment

0 Comments