बाल चित्रकला स्पर्धेत सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरावर यश
राहुरी ( प्रतिनिधी )
कलासंचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य व शिक्षण विभाग ( माध्यमिक ) जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित बालचिञकला स्पर्धेत सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कूल महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील तिन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उत्तुंग यश मिळवले,निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अशोकभाऊ फिरोदिया विद्यालय अहिल्यानगर येथे जि.प चे माध्य. शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचे हस्ते सन्मानित करण्यात आल्याची माहिती कलाशिक्षक हरेश्वर साळवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बक्षिस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानि जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी अशोक कडूस हे होते . पालक आणि कलाशिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत.असे प्रतिपादन केले.मुलांना अशा शासकीय स्पर्धेत सहभागी करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर ते उत्कृष्ट कलाकार नक्कीच घडतील असेही ते म्हणाले.
मधील तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर गट क्रमांक तीन (वय 9-12) मधून आरोही भगवान देशमुख,तृतीय, अनन्या राजू भोसले तृतीय, तर तन्वी अरुण आमले चतुर्थ क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक)श्री .अशोक कडूस साहेब , यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री.दरेकर साहेब , फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य - भाबड सर , जिल्हा माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी पवार साहेब , थोरात साहेब तसेच प्रशिद्ध चित्रकार अशोक डोळसे , सचिन सांगळे, स्पर्धा परिक्षक उपस्थित होते.
वरील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक हरेश्वर साळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ संस्थेचे सभापती मा. प्रमोद रसाळ साहेब, सचिव मा. महानंद माने साहेब, खजिनदार मा.महेश घाडगे साहेब तसेच सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ योगिता आठरे मॅडम, सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले .
Post a Comment
0 Comments