वंचित बहुजन आघाडी, लहुजी शक्ती सेना, आरपीआय तसेच फुले, शाहू,आंबेडकर चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी आ. प्राजक्त तनपुरे यांना मताधिक्य देण्याचा घेतला निर्णय
वंचित व आरपीआय पदाधिकारी आ.प्राजक्त तनपुरेंबरोबर राहुरी भागात मतविभाजन होऊ देणार नाही-निलेश जगधने
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी येथील आ.तनपुरे कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर चळवळीचे बाळासाहेब जाधव, वंचितचे जिल्हा महासचिव निलेश जगधने, आरपीआय संघटनेचे बाळासाहेब शिंदे,वंचितचे संपर्कप्रमख पिंटूनाना साळवे, महिला युवा जिल्हाध्यक्ष छायाताई दुशिंग,वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षा आयनोर पठाण, धम्मवेधा जाधव यांसह विविध संघटनेच्या पदाधिकार्यांनी एकत्र येत आ. तनपुरे यांना पाठींबा दिला. याप्रसंगी बाळासाहेब जाधव, निलेश जगधने, बाळासाहेब शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आ. तनपुरे यांच्या सारख्या विकासात्मक चेहऱ्याला पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
राहुरी परिसरात कधीही गट, तट, पक्ष न पाहता सर्वांच्या भावना जाणून घेत विकास कामे करणारे आ. तनपुरे यांच्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत. राहुरी मतदार संघामध्ये सर्व जाती धर्माला सोबत घेत आ. तनपुरे यांनी एकात्मता जोपासली आहे. तर जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करीत तरुणांना गुन्हेगार बनविण्यात मागिल काळात कोणाचा पाठबळ होता? हे राहुरीत सर्वानी पाहिलेले आहे. सर्वांना सोबत घेऊन राहुरी परिसराचे नंदनवन करण्यासाठी आम्ही पाठींब्याचा निर्णय घेतल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रस्ताविक संतोष आघाव यांनी केले. संजय साळवे, सुरेश निमसे, सुरेश म्हसे, वाय. एस. तनपुरे, नरेंद्र शिंदे, आदिनाथ तनपुरे, भास्कर आल्हाट, हरिदास जाधव, मिनाताई धाडगे आदी उपस्थित होते. माजी आमदार कर्डिले यांनी विजय मिळविण्यासाठी राहुरी परिसरात जास्तीत जास्त उमेदवार उभे राहावे म्हणून प्रयत्न केले. परंतू आम्हाला त्यांची खेळी कळाली असून राहूरी परिसरातील जनता आ. तनपुरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. संपूर्ण मतदार संघात शाहू, फुले आंबेडकर चळवळीचे आम्ही सर्व कार्यकर्ते मतदार संघ पिंजून काढत आ. तनपुरेंना मताधिक्य मिळून देऊ असे निलेश जगधने यांनी सांगितले.
लहुजी शक्ती सेनेला भाजप महायुतीच्या सहकारी पक्षाने लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी यांना विधानसभा निवडणुकीत विश्वासात न घेतल्याने आमच्या संघटनेने राहुरी नगर पाथर्डी मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांना एकमुखी पाठींबा देण्याचा निर्णय यावेळी ज्ञानेश्वर जगधने यांनी याच पत्रकार परिषदेत जाहीर केला .
Post a Comment
0 Comments