Type Here to Get Search Results !

राहुरीत तुतारीला ट्रंपेटचे आव्हान नाहीच

राहुरीत तुतारीला ट्रंपेटचे आव्हान नाहीच



नगर  जिल्ह्यात  सहा  ठिकाणी उमेदवारांना मात्र  ट्रंपेटची राहणार चिंता 




राहुरी  ( प्रतिनिधी )

        विधानसभा  निवडणुकीसाठी  नगर  जिल्ह्यातील बारा  विधानसभा  मतदारसंघात  अजित  पवार   राष्ट्रवादी  काँग्रेस  अजित  पवार  गट  व भारतीय  जनता पक्ष  हे  पाच  जागी ,



शिवसेना  शिंदे  गट  तीन  जागी  तर  शिवसेनेच्या  उद्धव ठाकरे गट दोन जागी निवडणुका लढवत आहेत .



राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सात ठिकाणी निवडणूक लढत असून जिल्ह्यातील सहा ठिकाणी तुतारी या चिन्हासमोर ट्रंपेट या चिन्हाचे आव्हान राहण्याचे चित्र दिसत आहे .

केवळ राहुरी मतदारसंघातच तुतारी या चिन्हा ला ट्रंपेटचे आव्हान नसणार आहे . राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षाचे मिळाल्याने पक्ष चिन्हावर निवडणूक लढवत आहे . राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे पक्षाकडून तू तरी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत .

लोकसभा निवडणुकीत तुतारी या चिन्हा बरोबरच अन्य उमेदवारांना ट्रंपेट अर्थात साधर्म्य असणारे पिपाणी असे चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या आकडेवारी वर परिणाम झाला असल्याचे दिसून आले होते . मात्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच शरद पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निश्चित झाल्याने दिलासा मिळाला . 

 नगर जिल्ह्यात बारा पैकी श्रीरामपूर , अकोले , पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष ट्रंपेट या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत . तर कोपरगाव येथे बळीराजा पार्टी , संगमनेरला समता पार्टी व श्रीगोंदा येथे सैनिक समाज पार्टीला ट्रंपेट चिन्ह मिळाले आहे . 

  राहुरी विधानसभा मतदारसंघात तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोर अन्य 12 उमेदवारांचे निवडणूक चिन्ह वेगवेगळे असल्याने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर कोणत्याही उमेदवाराची चिन्ह ट्रंपेट नसल्याने व अन्य चिन्ह असल्याने निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे उमेदवारासमोरची ट्रंपेट चिन्हाची ची चिंता मात्र मिटली आहे . राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत .

Post a Comment

0 Comments