होय बोचऱ्या थंडीतच ! मतमोजणीच्या दिवशी येणार बोचऱ्या थंडीचा अनुभव
सतर्क खबरबात जिल्ह्याची टीम - विशेष वृत्त
महाराष्ट्रात बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पारा जसा चढत होता , तसा तापमानाचा पारा उतरत असल्याचे चित्र आपण पाहिले आहे . त्यामुळे मतदान गुलाबी थंडीत होणार तर मतमोजणी बोचऱ्या थंडीत होणार काय असे चर्चेत असताना
16 नोव्हेंबर रोजी 31.2 कमाल व 19.3 किमान तापमान राहुरी परिसरात होते . त्या दरम्यान ढगाळ वातावरण होते . 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी कमाल तपमान दोन अंशाने तर किमान तपमान आठ अंशांनी घसरलेले दिसून आल्याने गुलाबी थंडीत राहुरीसह सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडली .
आज गुरुवारी राहुरीचे कमाल तपमान 28.8 अंश सेल्सिअस तर किमान तपमान 11.1 अंश सेल्सिअस इतकी नोंदली गेले . या तीन दिवसातच दिवसाच्या तापमानातही अडीच अंशांची घट झालेली दिसून येत आहे तर रात्रीच्या तापमानात सव्वातीन अंशाने घट झालेली दिसते .
शनिवारी 23 नोव्हेंबरला राहुरी येथील कै रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाच्या जिमखान्यामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे . त्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे . त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी राहुरी परिसर व अन्य सर्व ठिकाणी बोचऱ्या थंडीचा अनुभव सर्वांना नक्कीच येणार आहे .
Post a Comment
0 Comments