बिऱ्हाड निघालंयं ..S..S तोडीला.... फरक पडेल काय मतदानाला ....
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
सध्या एकीकडे विधानसभा निवडणुकांची प्रचाराची धामधूम सुरू असताना दुसरीकडे ऊसतोड कामगारांची जथेच्या जथे आपलं बिऱ्हाड , जनावर , कुटुंब
घेऊन कारखान्यांच्या दिशेने जाताना दिसत आहेत . ऊस तोडणी मजूर , कामगार ऊसतोडणी साठी जात असल्याने मतदानाचं काय होणार ? याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे .
दिवाळी सरताच कारखान्यांचे धुराडे पेटत असतात . ऊसतोड कामगारांची बिऱ्हाड घेऊन कंत्राटदार व ठेकेदारांमार्फत संबंधित कारखान्याच्या दिशेने जातात .यंदा दिवाळीचा हंगाम संपलेला असताना येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यभर एकाच दिवशी विधानसभेसाठी मतदान होणार आहे . असे असताना सध्या ऊसतोड कामगारांचे तांडे आपल्या बिराडासह साखर कारखान्यांच्या दिशेने रवाना होत आहेत . नगर मनमाड महामार्गावर गेल्या आठवडाभरापासून धुळे , जळगाव ,
नाशिक , नंदुरबार , मालेगाव आदी भागातून नगर , पुणे , बारामती , शिरुर , पंढरपूर , सांगली , सातारा , सोलापूरच्या दिशेने मालट्रक , ट्रॅक्टर जुगाडासह जाताना दिसत आहेत . या ट्रॅक्टर जुगाडांमध्ये लेकरांसह कामगार भगिनी , आपल्या मुलाबाळांना , बाजे , पालांचे साहित्य , गृह उपयोगी साहित्यसह दिसत आहेत . साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होत असताना येत्या 20 तारखेला विधानसभेच्या मतदान होणार असल्याने या साखर कारखान्यांच्या ऊसतोड कामगारांच्या मतदानाची काय होणार ? त्यांचे मतदान कसे होईल ? याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे .
Post a Comment
0 Comments